पक्ष फुटीचा फटका ज्या पद्धतींने ठाकरेंना बसला, त्या अनुशंगाने शिंदेंच्या शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात आली आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर स्थानिक पातळीवर शाखा, कार्यालये आणि निधी यावर नियंत्रणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या समस्या भविष्यात टाळण्यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ‘शिवकोष - शिवसेना विश्वस्त संस्था’ या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
या संस्थेच्या स्थापनेसाठीचा प्रस्ताव पक्षाचे नेते बालाजी किणकर यांनी या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मांडला होता. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला असून, संस्थेच्या माध्यमातून पक्षाच्या सर्व आर्थिक, प्रशासकीय आणि मदतीसंबंधी कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
>> ‘शिवकोष’ संस्थेअंतर्गत पुढील कामे केली जाणार:
> राज्यभरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालये आणि शाखांचे व्यवस्थापन
> पक्ष निधीचे योग्य नियोजन आणि वापर
> गरजू कार्यकर्त्यांना मदतीचे वाटप
> शिवसेनेच्या सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांचे नियोजन
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचा निधी, स्थानिक पातळीवरील काही शाखा कार्यालये आदींच्या ताब्यावरून मोठा वाद उफाळून आला होता. शिवसेना ठाकरे गटाकडे असणार्या विशेषत: मुंबईतील शाखांच्या जागा या पक्षाच्या नावावर नसून ट्रस्टच्या नावावर आहेत. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष ताब्यात आल्यावरही शिंदे गटाच्या ठाकरे गटाच्या शाखा गेल्या नाहीत, अथवा त्यांनी दावादेखील केला नाही.