TRENDING:

'जरांगे मुंबईत का आलेत, शिंदेंना विचारा' राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय?

Last Updated:

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारला असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक विधान करुन एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडीच केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास्त्र उगारलंय. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या या आंदोलनावरून ठाकरे बंधूंनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोंडी केलीय. जरांगे मुंबईत का आलेत हे एकनाथ शिंदेंनाच विचारा असं सूचक वक्तव्यच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय.
राज ठाकरे-एकनाथ शिंदे
राज ठाकरे-एकनाथ शिंदे
advertisement

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानात तळ ठोकला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत धडकला आहे. मुंबईत मराठा बांधवांचा झंझावात पाहायला मिळतोय. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी घेतलाय. एकीकडे जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारला असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक विधान करुन एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडीच केली आहे.

advertisement

मराठा आरक्षण प्रश्नावर एकनाथ शिंदेच उत्तर देतील, असे राज ठाकरे सूचकपणे म्हणाले. मराठा आरक्षण प्रश्नावर दोन ते तीन प्रश्न त्यांना विचारले गेले. परंतु त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच मनोज जरांगे मुंबईत का आलेत, शिंदेंना विचारा, असे राज ठाकरे म्हणाल्याने त्यांच्या बोलण्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.

advertisement

राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षी जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत धडकला होता. त्यावेळी राज्याची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती होती. मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याविषयीचा आध्यादेश तत्कालीन शिंदे सरकारने काढला होता. आता राज ठाकरेंनी शिंदेंना त्याची आठवण करुन दिलीय.

advertisement

एकीकडे राज ठाकरे यांनी शिंदेंना घेरलेलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनीही शिंदेंवर निशाणा साधलाय. फडणवीसांना अडचणीत आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.

मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय वादात उद्धव ठाकरेही मागे नाही. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. तसेच एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आश्वासनाची आठवणही करून दिली...

advertisement

ठाकरे बंधूंसह विरोधकांनी एकनाथ शिंदेंची आरक्षणाच्या प्रश्नावरून कोंडी केलीय. तर एकनाथ शिंदेंनीही विरोधकांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय. मराठ्यांना न्याय देण्यास ठाकरे अपयशी ठरल्याचे सांगत त्यांच्याच कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असे शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नी तोडगा काढण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय कुरघोडीही सुरू झाल्याचं दिसून येतंय. आणि यातून राजकारणही तापलंय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'जरांगे मुंबईत का आलेत, शिंदेंना विचारा' राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल