स्टँप ड्युटी म्हणजेच, मुद्रांक शुल्क होय. मालमत्तेसबंधित कोणताही व्यवहार करताना हे मुद्रांक शुल्क भरावं लागतं. तुम्ही घर घेतलं किंवा व्यावसायिक वापरासाठी जागा घेतली तरीही तुम्हाला स्टँप ड्युटी भरावी लागते. ही ड्युटी राज्यामध्ये महानगरं, शहरं आणि गाव यांच्यासाठी वेगवेगळी असते. मालमत्तेची विक्री,हस्तांतरण, मालमत्ता भेट देत असल्याचा करार, गहाण ठेवणे, भाडेकरार, भाडेपट्टी, कुळ वहिवाट या सगळ्या व्यवहारांमध्ये कागदपत्रांचं मुद्रांकन करणं गरजेचं असतं.
advertisement
तुम्ही घेत असलेल्या मालमत्तेची किंमत किती आहे, यानुसार मुद्रांक शुल्क आकारलं जातं. यासाठी तुम्हाला तुमच्या मालमत्तेची किंमत माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासन जमीन किंवा इतर प्रॉपर्टीसाठी दरवर्षी काही दर नक्की करते. स्टॅम्प ड्युटी कशी भरायची? महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विविध मार्गांनी भरता येऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुम्ही स्वतः इंटरनेटचा वापर करून ई- पेमेंट करू शकता किंवा मग बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन काऊंटरवरून पैसे भरू शकता. आता पर्यंतची पद्धत म्हणजे स्टँप पेपर, मुद्रांक कागद आणि चिकटवायचे स्टँप्स - Adhesive stamps मार्फतही ही ड्युटी भरता येते.