ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेवराई शहराजवळील वडगाव ढोक इथं दाखल झाले होते. त्याच दरम्यान हा राडा झाला. आमदार पंडित समर्थकांनी हाके यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला. जोदार घोषणाबाजी करत हाकेंच्या निषेध करण्यात आला. एवढंच नाहीतर दगडफेकही करण्यात आली. लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद गेवराई शहरात पडले होते.
advertisement
>> नेमका राडा सुरू का झाला?
बीडच्या गेवराई मधील दगडफेक आणि झालेल्या राड्याचं कारण समोर आले आहे. हाके यांचे सहकारी सुनील ढाकणे नावाच्या व्यक्तीने आपल्या पायातील चप्पल काढून जमावाच्या दिशेने फेकली. बळीराम खटके यांनीही जमावाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार पंडित समर्थकांनी हाके यांच्या दिशेने दगड आणि चप्पला फेकल्या झाल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आलं आहे.
गेवराई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>> नेमकं काय घडलं?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराई शहरात येवू नये यासाठी त्यांना प्रतिबंधक नोटीस बजावली होती. मात्र, तरीही हाके यांनी पोलीसांचा आदेशाला न जुमानता ते आपल्या कार्यकर्त्यांसह गेवराई शहरात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले. चौकात थांबुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याच वेळी काही लोक हाके यांचा निषेध करत होते. पोलिसांनी हाके यांना पुढील प्रवासासाठी निघून जाण्याची सुचना केली असता, हाके व त्यांचे कार्यकत्यांनी पोलिसांच्या सुचनांकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आणि ते तिथेच थांबले.
त्याच दरम्यान, हाके यांच्यासोबत असलेल्या सुनील ढाकणे नावाच्या व्यक्तीने आपल्या पायातील चप्पल काढून जमावाच्या दिशेने फेकली. यामुळे दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी झाली आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बळीराम खटके यांनीही जमावाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार पंडित समर्थकांनी हाके यांच्या दिशेने दगड आणि चप्पला फेकल्या. दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून दोन्ही गटांना पांगवले आणि हाके यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
>> 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
या घटनेनंतर, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 189(2), 190, 191(2), 191(3), 285, 223 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रा. लक्ष्मण हाके, सुनील ढाकणे, बजरंग सानप, बळीराम खटके, पवन कारवार, सिध्द्ध पघळ, मुक्ताराम आव्हाड, शिवाजी गवारे, दत्ता दाभाडे, अशोक बोरकर, वसीम फारुखी, शाहरुख पठाण, संतोष सुतार आणि मोईन ख्वाजा शेख यांचा समावेश आहे.
>> कोणाचीही हयगय करणार नाही...
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणारा कोणीही असला तरी त्याची अजिबात गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था हातात घेणारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल" असा इशारा बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.
