TRENDING:

Hingoli: 3 वर्षांची आरती आईच्या कुशीत कायमची झोपली, दृश्य पाहून गावकरी हादरले, हिंगोलीतील घटना

Last Updated:

पाणी भरायला जाते असं सांगून मुलीसह विहिरीवर गेली. त्यानंतर सीमाने आपल्या ३ वर्षांच्या लेकीसह विहिरीत उडी मारली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष खरात, प्रतिनिधी
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

हिंगोली : हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या ३ वर्षांच्या लेकीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण इथं ही घटना घडली.  सीमा मुकाडे असं आईचे तर आरती मुकाडे असं मयत चिमुरडीचं नाव आहे. सीमा आपल्या मुलीसह विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाते असं घरतील लोकांना सांगून गेली. पण संध्याकाळ झाली तर ही परत आली नाही. त्यामुळे घरातील लोकांनी शेताकडे धाव घेतली असता विहिरीमध्ये सीमा आणि आरतीचा मृतदेह आढळून आला. सीमा आणि तिच्या लेकीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची बातमी गावात वाऱ्या सारखी पसरली.

advertisement

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीमा आणि आरतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून सासरच्या लोकांकडून सीमाला त्रास दिला जात होता.  मयत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरच्या लोकांकडून सीमाचा छळ केला जात होता. त्यामुळे या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचललं. पाणी भरायला जाते असं सांगून मुलीसह विहिरीवर गेली. त्यानंतर सीमाने आपल्या ३ वर्षांच्या लेकीसह विहिरीत उडी मारली.  मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पती आणि सासऱ्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hingoli: 3 वर्षांची आरती आईच्या कुशीत कायमची झोपली, दृश्य पाहून गावकरी हादरले, हिंगोलीतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल