पेशवाई पिझ्झा हा 10 इंचाचा असून तो एकट्या व्यक्तीसाठी खाण्यासाठी खूप मोठा आहे. यामध्ये तब्बल 6 वेगवेगळे फ्लेवर असतात. पनीर मराठा, सुपर स्पायसी, माको सुप्रीम, व्हेज फार्म मराठा आणि सिम्पली डिलाईट हे काही प्रमुख फ्लेवर आहेत. पारंपरिक इटालियन पिझ्झाला मराठमोळा स्वाद देण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे ग्राहकांसाठी हा एक नवा अनुभव ठरतो आहे.
advertisement
मिस्टर पिझ्झामध्ये केवळ पेशवाई नव्हे तर एकूण 14 प्रकारचे विविध चवींचे पिझ्झा उपलब्ध आहेत. पास्ता पिझ्झा, चीज पिझ्झा, जैन पिझ्झा यांसारखे पर्याय देखील येथे चव घेता येतात. विशेष म्हणजे या सर्व पिझ्झांची किंमत अगदी 80 रुपये ते 249 रुपये दरम्यान आहे, जे खवय्यांसाठी चांगला पर्याय ठरतं आहेत.
व्यवसाय सुरू करताना लोकांना नवनवीन फ्लेवरमध्ये पिझ्झाचा अनुभव देता यावा, असा उद्देश होता. त्या दृष्टिकोनातून विविध चवीचे प्रयोग केले आणि त्यातूनच पेशवाई पिझ्झाची कल्पना साकारली. पारंपरिक आणि स्थानिक पदार्थ एकत्रित करून हा तयार केला आहे. पिझ्झाला पुणेकर खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, असं पुरब सागरे यांनी सांगितलं.