मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील निमगाव इथं ही घटना घडली. या गावात रामा मोहन राठोड यांच्या मुलाचा मुलगा स्वस्तिक सचिन राठोड (वय अडीच वर्षे) आणि दिवाळीसाठी आलेली मुलीची मुलगी श्रावणी विठ्ठल चव्हाण (वय २ वर्षे रा. बेलखेड ता. उमरखेड) अशी मृत मुलांची नावं आहे. घराबाहेर स्वस्तिक आणि श्रावणी खेळत होते. खेळता खेळता दोघेही घराजवळ बाजूला असलेल्या एका कालव्याजवळ गेली. तिथे तोल जाऊन दोघेही बुडाली.
advertisement
बराच वेळ झाला दोन्ही चिमुरडे कुठे दिसत नसल्यामुळे सगळीकडे शोधाशोध सुरू केला. परंतु, मुलं कुठेच सापडली नाहीत. काही वेळाने बाजुला असलेल्या इसापुरच्या कॅनॉलमध्ये दोघेही आढळून आले. हालचाल होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ निमगाव येथील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
