TRENDING:

शिक्षकांचा अजब कारभार, खड्डे बुजवण्यासाठी विद्यार्थ्यांनाच लावलं कामाला!

Last Updated:

शाळेमध्ये येताना रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी इथला शिक्षक आणि चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी हे शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असतात आणि तिथल्या शिक्षकांचे काम असतं ते आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकवावं आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल घडावं पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील पेंढापूर इथं धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील शिक्षकांनी शाळेमध्ये येताना रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी इथला शिक्षक आणि चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावलेला आहे.

advertisement

रस्त्यावर अडथळा ठरणारे खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच झुंपल्याची धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गंगापूर तालुक्यात ढोरेगाव- भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत 110 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शिकवण्यासाठी ६ पुरुष शिक्षक तर ४ महिला शिक्षक कार्यरत आहेत. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथून आणि भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून ये जा करणाऱ्या शिक्षकांना त्रास होतो. ही शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी चक्क शाळकरी मुलांना खड्डे बुजवण्यासाठी जुंपलं.  विशेष म्हणजे, आमदार प्रशांत बंब सातत्याने शिक्षकांवर टीका करत असतात. याच आमदाराच्या मतदारसंघांमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विद्यार्थ्याला सांगितल्याची घटना उघडकीस झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

याबाबत शाळेचे मुख्याध्यापकांना विचारला असता ते म्हणाले की, शिष्यवृत्तीच्या बैठकीसाठी मी गंगापूर येथील बैठकीसाठी आलो होतो. यामुळे खड्डे बुजवण्याच्या प्रकारासंदर्भात मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर शिक्षकांना समज दिले जाईल, असं पेंढापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय इंगळे म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिक्षकांचा अजब कारभार, खड्डे बुजवण्यासाठी विद्यार्थ्यांनाच लावलं कामाला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल