TRENDING:

प्रत्येक भारतीयावर किती परकीय कर्ज, Latest रक्कम ऐकूनच अंगावर काटाच येईल; RBIचा धक्कादायक रिपोर्ट, अर्थव्यवस्थेसाठी इशारा

Last Updated:

Foreign Debt On Indian: RBI च्या ताज्या अहवालानुसार जून 2025 अखेर भारताचे परकीय कर्ज तब्बल 747 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. म्हणजेच प्रत्येक भारतीयावर सरासरी 44,000 हून अधिक कर्जाचा बोजा आला आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार जून 2025 अखेर भारताचे परकीय कर्ज वाढून 747.2 अब्ज डॉलर्स झाले आहे. मार्च 2025 अखेर हे कर्ज 736 अब्ज डॉलर्स इतके होते. म्हणजेच तीन महिन्यांत परकीय कर्जात तब्बल 11.2 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

advertisement

भारताची लोकसंख्या 140 कोटी मानली, तर प्रत्येक नागरिकावर सरासरी 44,772 इतके परकीय कर्ज येते. मात्र GDPच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण किंचित कमी झाले आहे. मार्चमध्ये हे प्रमाण 19.1 टक्के होते, तर जून अखेर ते घटून 18.9 टक्के राहिले.

advertisement

रुपयाच्या घसरणीचा परिणाम

RBI च्या माहितीनुसार, रुपयाची घसरण आणि प्रमुख परकीय चलनांच्या (अमेरिकन डॉलर, युरो, येन, SDR) विनिमय मूल्यातील बदलामुळे कर्जाच्या आकडेवारीत 5.1 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. हा प्रभाव वेगळा धरला, तर मार्च ते जून या कालावधीत प्रत्यक्ष परकीय कर्जात फक्त 6.2 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असती. परंतु अधिकृत आकडेवारीनुसार ही वाढ 11.2 अब्ज डॉलर्स दाखवली जाते.

advertisement

दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज

जून 2025 अखेर दीर्घकालीन (एक वर्षाहून अधिक) परकीय कर्ज 611.7 अब्ज डॉलर्स इतके होते, जे मार्चपेक्षा 10.3 अब्ज डॉलर्सने जास्त आहे. अल्पकालीन (एक वर्षापर्यंत) कर्ज एकूण परकीय कर्जाच्या 18.1 टक्के इतके होते. मार्चमध्ये हे प्रमाण 18.3 टक्के होते.

advertisement

अल्पकालीन कर्जाचा परकीय चलनसाठ्याशी असलेला अनुपातही कमी झाला आहे. मार्चमध्ये तो २०.१ टक्के होता, तर जून अखेर 19.4 टक्के झाला.

कोणत्या चलनात जास्त कर्ज?

भारताचे परकीय कर्ज सर्वाधिक प्रमाणात अमेरिकन डॉलर या चलनात आहे. डॉलरमधील कर्जाचा वाटा एकूण परकीय कर्जाच्या 53.8 टक्के आहे. त्यानंतर भारतीय रुपया (30.6 टक्के), जपानी येन (6.6 टक्के), SDR (4.6 टक्के) आणि युरो (3.5 टक्के) असा क्रम लागतो.

कोणत्या क्षेत्रांवर परकीय कर्जाचे ओझे?

RBI च्या अहवालानुसार, एकूण परकीय कर्जात सर्वाधिक वाटा गैर-वित्तीय कंपन्यांचा (35.9 टक्के) आहे. त्यानंतर जमा स्वीकारणाऱ्या संस्था (केंद्रीय बँक वगळून), सामान्य सरकार आणि इतर वित्तीय संस्थांचा क्रमांक लागतो.

जून 2025 अखेर परकीय कर्जाच्या संरचनेत :

34.8 टक्के कर्जाच्या स्वरूपात

23 टक्के चलन व ठेवींच्या स्वरूपात

17.7 टक्के व्यापार कर्ज आणि आगाऊ रक्कम स्वरूपात

16.8 टक्के कर्जरोख्यांच्या स्वरूपात

परतफेडीची स्थिती

जून 2025 अखेर कर्ज आणि व्याज परतफेडीचे एकूण प्रमाण चालू प्राप्तींच्या (Current Receipts) 6.6 टक्क्यांवर स्थिर राहिले. हे प्रमाण मार्च 2025 मधील स्तरा इतकंच होतं.

मराठी बातम्या/मनी/
प्रत्येक भारतीयावर किती परकीय कर्ज, Latest रक्कम ऐकूनच अंगावर काटाच येईल; RBIचा धक्कादायक रिपोर्ट, अर्थव्यवस्थेसाठी इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल