माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या डेटानुसार, राज्यभरात एकूण 1183 अधिकारी-कर्मचारी या योजनेंतर्गत लाभ घेतल्याचं समोर आलं. महिला व बाल विकास विभागाने ही यादी ग्रामविकास विभागाला दिली असून, संबंधित जिल्हा परिषदेकडे चौकशी व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. याआधी 14 हजार पुरुष, 6 लाखहून अधिक महिला अपात्र ठरल्या होत्या. लाडकी बहीण योजनेत काही घोटाळे झाल्याचंही फेरतपासणीत समोर आलं.
advertisement
ज्या सरकारी कर्मचारी नियमांना केराची टोपली दाखवून लाभ घेतला त्यांच्यावर शिस्तभंगची कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदांनी महिला व बाल विकास विभागाकडे सादर करणे बंधनकारक असेल, अशी माहिती ग्रामविकास विभागाच्या पत्रातून देण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही अर्ज पुन्हा फेरतपासणी केले जाणार आहेत. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी 8 ऑगस्टला लाडकी बहीणचा हप्ता खात्यावर जमा झाला. त्याआधीपासून ही फेरतपासणी केली जात आहे.
लाडकी बहीणच्या पात्रतेच्या अटी काय आहेत?
लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असावीत
सरकारी नोकरी नसावी, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी नसावेत
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे
पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
आधार लिंक्ड बँक खाते आणि अधिवासाची पुरावा (जसे की रेशन कार्ड, जन्मदाखला, मतदार ओळखपत्र इ.) असणे आवश्यक
विवाहिता, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला, तसेच एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते.
मतदारसंघातून 'गायब' तानाजी सावंत यांचा तहसीलदारांना फोन, सोशल मीडियावर चर्चा
अपात्रतेच्या अटी काय आहेत?
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास अपात्र
कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा असेल तर अपात्र
कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात नियमित, कायमस्वरूपी, सेवानिवृत्त किंवा पेन्शन धारक असल्यास अपात्र
जर महिला इतर राज्य/केंद्र सरकाराच्या योजना अंतर्गत दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा अधिक लाभ घेत असेल, तर अपात्र
सध्याचे किंवा माजी खासदार/आमदार कुटुंबातील असल्यास अपात्र
कुटुंबातील सदस्य राज्य/केंद्रच्या बोर्ड, कॉर्पोरेशन इ. मध्ये अध्यक्ष/सदस्य असल्यास अपात्र
कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असल्यास अपात्र
लग्न करुन परराज्यात गेल्यास ती व्यक्ती अपात्र ठरेल