धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या गावात चुक्याची शेती केली जाते. पिंपळा खुर्द या गावातील 90 टक्के शेतकरी खरीप हंगामात पावसाळी कांद्याचे उत्पादन घेतात. पावसाळी कांद्यानंतर ते कांद्याच्या शेतात चुका या पिकाची लागवड करतात. पिंपळा खुर्द गावातील शेतकरी बालाजी पाटील यांच्याकडे 7 एक्कर चुक्याची लागवड केलेली आहे. चुक्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या गावात चुका उत्पादन घेतले जाते. चुका या पिकाच्या लागवडीतून चांगलं उत्पादन होत असल्याचेही यावेळी शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.
advertisement
कांद्यानंतर कोसळले पपईचे भाव, हतबल शेतकऱ्यानं बागेवर फिरवला रोटावेटर, Video
एक एकर चुका लागवडीसाठी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो तर चुक्याची लागवड सरी पद्धतीने, इनलाईन ड्रीपच्या सहाय्याने देखील करता येते. चुक्याचे बी तयार झाले की हैदराबाद येथे विक्री केली जाते. हैदराबाद येथे बियाण्यांना मोठी मागणी आहे. चुक्याला 50 ते 60 रुपयांपासून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतो. चुका लागवडीतून एकरी 50 ते 60 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन होत असल्याचे शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.