सोलापूर : आता शेतकरी बांधव पारंपरिक शेतीसह भाजीपाला, फळं आणि फुलांच्या लागवडीतून उत्तम उत्पन्न मिळवू लागले आहेत. शेतात विविध प्रयोग करून चांगलं उत्पादन घेतलं जातं. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी आपल्या शेतात 10 बाय 10 गुंठा जागेत विविध पिकं घेतली आहेत. या पिकांची विक्री केवळ आठवडी बाजारात केली जाते आणि त्यातून त्यांची आज उलाढाल आहे लाखो रुपयांची.
advertisement
मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात शेतकरी महादेव, ज्ञानेश्वर आणि संजय हे 3 हिप्परकर बंधू एकत्र राहतात. त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. संजय पाचवी, महादेव तिसरी आणि ज्ञानेश्वर आठवीपर्यंत शिकले आहेत. त्यांनी शेतीत जम बसवायचं ठरवलं. सुरुवातीला वांग्याचं पीक घेतलं, त्यानंतर मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, पालक, मिरची या विविध भाज्यांचं उत्तम उत्पादन घेतून हे कुटुंब आज लखपती झालंय.
हेही वाचा : BSc Agricultureच्या थेट दुसऱ्या वर्षात मिळतो प्रवेश! कुठं करायचं Apply?
सुरुवातीला दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी आपलं घर चालवलं, मग 20 पूर्वींपूर्वी तिन्ही भावांनी एकत्र येऊन शेती करायला सुरुवात केली. ते आपल्या शेतातला माल बाजार समितीतील मार्केटला न विकता सर्व माल आठवडी बाजारात विकतात. विशेष म्हणजे त्यांच्या या दर्जेदार मालाची ग्राहकांनाही प्रतीक्षा असते. परिणामी हिप्परकर बंधूंना यातून कमालीचं उत्पन्न मिळतं.
ग्राहकांना ताजी भाजी मिळावी यासाठी हिप्परकर कुटुंब पहाटेपासूनच भाजीपाला काढतात. मग मोटारसायकल घेऊन परिसरातील आठवडी बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनाही त्यांच्या शेतमालाची प्रतीक्षा असते.