अलिकडे अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून वळले आहेत. खामगाव येथील अंधारे बंधू पारंपरिक शेती करत होते. मात्र, बेभरवशाच्या शेतीमुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यातच कोरोनाच्या काळात कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाकिची झाली होती. परंतु, यातून सावरत आई मंगल अंधारे आणि मोठा भाऊ योगेश यांनी दोघा भावांना पशुपालन करण्याचा सल्ला दिला. हाच सल्ला माणून शेतीला जोडधंदा म्हणून अंधारे बंधूंनी गोपालन सुरू केलं.
advertisement
धाराशिवच्या शेतकऱ्याची कमाल, टोकन पद्धतीनं लावली तूर अन् शेंगानं लगडलं झाड
दिवसाला लाखोंची कमाई
अंधारे बंधूंनी एचएफ होस्टन जातीच्या नऊ गाई घेतल्या. या गाईंपासून दिवसाला 10 ते 17 लिटरपर्यंत दूळ मिळते. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी मिळून 150 लिटरहून अधिक दूध जाते. यातून महिन्याकाठी 1 लाख 20 हजारांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे गणेश अंधारे सांगतात.
जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची केली सोय
अंधारे यांनी जनावरांच्या चाऱ्याची सोय केली. त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्रावरती मका, कडवळ त्याचबरोबर सुपर नेपियर 5 जी या गवताची लागवड केली आहे. जनावरांची देखभाल आणि दुधाचा व्यवसाय गणेश आणि निखिल हे करीत असून त्यांना त्यांच्या पत्नी संगीता व निशा या मदत करतात. खरंतर कोरोनाच्या काळात हे कुटुंब डळमळीत झालं होतं. आईच्या सल्ल्याने आणि भावाच्या मार्गदर्शनाने हे कुटुंब वर्षाकाठी लाखो रुपये कमावत आहेत.
वडिलांच्या निधनानंतर गावकऱ्यांचा मदतीचा हात, धाराशिवच्या कन्येनं गाजवलं सिंगापूर
कुक्कुटपालन, शेळीपालनाची साथ
पशुपालनासोबतच अंधारे कुटुंबीयांनी शेळीपालन आणि कुक्कुटपालनही सुरू केले. उस्मानाबादी शेळ्यांपासून त्यांना वर्षाकाठी 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळतेय. तर कोंबड्यांपासून वर्षाकाठी तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, असे मंगल अंधारे यांनी सांगितले.