कसा केला प्रयोग?
प्रल्हाद येलेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी 2014 साली 300 जांभूळ झाडांची लागवड आपल्या दोन एकर शेतात केली. यासाठी त्यांनी पालघर येथून बहडोली जातीची रोपे विकत आणली. रोप खरेदीसाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी जांभूळ पिकात सोयाबीन हे आंतरपीक घेतले. यातून त्यांना दरवषी 15 क्विंटल सोयाबीन होत असे.
advertisement
कोरोनाकाळात घेतला धडा, ‘या’ शहरातल्या नागरिकांनी भरवस्तीत तयार केलं पक्षी उद्यान
येलेकर यांच्या शेतामध्ये 2021 पासून जांभळाचे उत्पन्न सुरू झाले. पहिल्या वर्षी १ ते दीड लाख रुपये यातून त्यांना मिळाले. दुसऱ्या वर्षी २.५ लाखांचे उत्पन्न त्यांनी जांभूळ शेतीमधून घेतलय.
या वर्षी जांभळाचं चांगलं उत्पन्न झालंय. आम्ही आतापर्यंत दोन टन जांभळाची विक्री केली आहे. तर आणखी चार टन माल झाडावर आहे. सध्या यातून दोन लाख रुपये झाले असून आणखी पाच लाख रुपये कमा होतील अशी आपली अपेक्षा असल्याचं येळेकर यांनी सांगितले.
कमी पाण्यात करा 'या' पद्धतीनं लिंबाची शेती, कोणत्याही ऋतूत असते विशेष मागणी,
शेतीसमोरची आव्हानं अधिक गडद होत असताना जालना जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी यातून मार्ग काढलाय. नवीन प्रयोग करून तो यशस्वी देखील केलाय. या प्रयोगातून ते चांगला आर्थिक फायदा देखील मिळवत आहेत. योग्य नियोजन आणि प्रयोग करण्याचे धाडस यामुळे हे शेतकरी यशस्वी ठरत आहेत. जालन्यातील प्रल्हाद येळेकर यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शक आहे.