कोरोनाकाळात घेतला धडा, ‘या’ शहरातल्या नागरिकांनी भरवस्तीत तयार केलं पक्षी उद्यान, Video
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
या भागात दिवसभर शेकडो वेगवेगळे पक्षी चिवचिवाट करतात. त्यांच्या मंजुळ आवाजानं परिसरातील नागरिकांची सकाळ प्रसन्न वातावरणात सुरू होतीय.
जालना, 7 ऑगस्ट : हल्ली पक्षांचा वावर खूप कमी झालाय. घराच्या गॅलरीत, मोकळ्या अंगणात चिवचीनारे पक्षी दुर्मिळ झालेत. याच पक्ष्यांना पुन्हा एकदा साद घालण्यासाठी जालनाकर सरसावले आहेत. जालना शहरातील व्यंकटेश नगर भागातील नागरिकांनी 50 हजार स्क्वेअर फूट क्षेत्राच्या मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर केलाय. त्यांनी या भागात लोकवर्गणीतून पक्षांसाठी पार्क तयार केलंय. या भागात दिवसभर शेकडो वेगवेगळे पक्षी चिवचिवाट करतात. त्यांच्या मंजुळ आवाजानं परिसरातील नागरिकांची सकाळ प्रसन्न वातावरणात सुरू होतीय.
कशी झाली सुरूवात?
व्यंकटेश नगर भागात 50 हजार चौरस फुटांचा ओपन स्पेस आहे. या मोकळ्या जागेचा काय उपयोग करता येईल यावर स्थानिक नागरिकांनी चर्चा केली. त्यावेळी आपण पक्षांसाठी इथे काहीतरी केलं पाहिजे, असं आम्ही ठरवलं. कोरोना काळातील वातावरणामुळे आम्हाला धडा मिळाला होता. त्यानंतर या जागेवर पक्षी उद्यानाची संकल्पना समोर आली.
advertisement
आम्ही स्थानिकांनी लोकवर्गणी काढून या जागेला कंपाऊंड केलं. त्यानंतर इथं बोर घेतला. 180 वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. जॉगिंग ट्रॅक तयार केला. बसण्यासाठी व्यवस्था केली. पक्षांना दनापण्याची देखील सोय करण्यात आली, अशी माहिती येथील रहिवाशी प्रा रावसाहेब कांगणे यांनी दिली.
advertisement
दोन वर्षांपासून आम्ही हे ओपन स्पेस ला विकसित करण्याचे काम करत आहोत. कॉलनी मधील लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. प्रत्येकाने यामध्ये काही ना काही योगदान दिलं आहे. पक्षी घरासाठी गावातील लोकांनी देखील आम्हाला साथ दिली. या उद्यानात दररोज 700 ते 800 चिमण्या, 150 ते 200 कबुतर, 50 ते 60 मैना आणि काही प्रमाणात बगळे देखील इथे येत आहेत, असं राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.
advertisement
सगळ्यांच्या सहकार्याने हे पक्षी उद्यान विकसित केलं आहे. सुरुवातील पक्षी येत नव्हते मात्र आता मोठ्या संख्येने पक्षी येत असल्याने आनंद होत आहे. सध्या दररोज 10 किलो धान्य इथे लागते. पक्षी संख्या वाढल्यानंतर धान्य देखील अधिक प्रमाणात लागणार आहे त्यामुळे ज्यांची इच्छा असेल ते आम्हाला सहकार्य करू शकतात असं आवाहन या नागरिकांनी केलं आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 07, 2023 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
कोरोनाकाळात घेतला धडा, ‘या’ शहरातल्या नागरिकांनी भरवस्तीत तयार केलं पक्षी उद्यान, Video