TRENDING:

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुमचे जनावर गरोदर आहे की नाही? घरबसल्या काही सेकंदात मिळणार माहिती

Last Updated:

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, केंद्रीय म्हैस संशोधन हिसार आणि भारत सरकारच्या तंत्रज्ञान विभागाने एक किट तयार केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

शाहजहांपुर : जेव्हा पशुपालक गाई किंवा म्हशीला करवून घेतात, तेव्हा अनेकदा जनावरे गर्भधारणा करू शकत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत पशुपालकाला समजते की त्याची गाय किंवा म्हैस गरोदर नाही, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होते. मात्र, आता पशुपालकांसाठी एक चांगली बातमी आहे.

भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने असे स्पेश किट बनवले आहे. या किटमुळे पशुपालक स्वत: जनावराची गर्भधारणा स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ शकतील. शिवकुमार यादव कृषी विज्ञान केंद्र, नियामतपूर येथे सेवेत असलेले पशुसंवर्धन विभागाचे तज्ज्ञ डॉ. शिवकुमार यादव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

IRCTC चं स्पेशल पॅकेज, भारत गौरव ट्रेनने करा 7 ज्योतिर्लिंगाची यात्रा, EMI चीही सुविधा

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, केंद्रीय म्हैस संशोधन हिसार आणि भारत सरकारच्या तंत्रज्ञान विभागाने एक किट तयार केले आहे. या किटमध्ये प्राण्यांच्या लघवीचे दोन थेंब टाकल्यानंतर काही सेकंदात त्याचा परिणाम दिसून येतो. यामुळे जनावरे गाभण आहे की नाही याची माहिती पशुपालकाला मिळते. जनावराच्या गर्भधारणेची वेळीच माहिती मिळाल्याने शेतकरी आपल्या जनावराची उत्तम काळजी घेतो. त्यामुळे गर्भाचा विकासही चांगला होतो. निरोगी जनावर जन्माला येतात आणि शेतकऱ्यांना चांगले दूध उत्पादन मिळते, अशी माहितीही त्यांनी दिली.

advertisement

ना तेल-ना मसाला, ब्रेकफास्टमध्ये या 5 डिश तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या, दिवसभर राहील energy

प्राण्यांची गर्भधारणा कशी तपासणार -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसामुळे लिंबू झाले 'कडू', किलोला इतका भाव, शेतकऱ्यांना आलं रडू, Video
सर्व पहा

पुढे त्यांनी सांगितले की, गरोदरपणाची स्थिती जाणून घेणारे किट प्रेगा-डी किट म्हणून ओळखले जाते. हे किट जनावरांची औषधे विकणाऱ्या मेडिकल स्टोअरमधून किंवा डॉक्टरांकडून 10 रुपयांना खरेदी करता येईल. गरोदरपणाची चाचणी करण्यासाठी या किटर गाय किंवा म्हशीच्या मूत्राचे दोन थेंब टाकावे लागतात. जर काही सेकंदात किटच्या डिस्प्लेवर गडद लाल किंवा जांभळा रंग दिसला तर प्राणी गरोदर आहे आणि पिवळा किंवा हलका रंग दिसल्यास प्राणी गर्भवती नाही, असे मानावे, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी लोकल18 शी बोलताना दिली.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुमचे जनावर गरोदर आहे की नाही? घरबसल्या काही सेकंदात मिळणार माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल