ना तेल-ना मसाला, ब्रेकफास्टमध्ये या 5 डिश तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या, दिवसभर राहील energy
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जून महिना सुरू झाला आहे. मात्र, तरीही प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये तेल, मसाला कमी असलेले पदार्थ खायला हवेत. जर तुम्हालाही कमी तेल आणि कमी मसाला असलेले पदार्थ नाश्त्यामध्ये खायचे असतील तर आम्ही तुम्हाला 5 असे महत्त्वाचे पदार्थ सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जादायी राहाल. (गुलशन कश्यप, प्रतिनिधी)
सकाळच्या नाश्त्यात तुम्ही अंकूरित मूग खाऊ शकतात. यामध्ये 47 कॅलरी असते. यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जादायी राहाल. यामध्ये कांदा, टोमॅटो, खिरे, आले, कोथिंबीर, मीठ, लिंबू आणि मिरची टाकून तुम्ही नाश्ता करू शकतात. त्यासाठी फक्त तुम्हाला रात्री मूग पाण्यात भिजत घालावे लागतील. यानंतर सकाळी तुम्ही हा हेल्दी नाश्ता करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये कोबीच्या सॅलडचाही समावेश करू शकता. कोबीच्या सॅलडमध्ये मीठ घालून तुम्ही ते खाऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात स्प्रिंग ओनियन किंवा ब्रोकोलीचाही वापर करू शकता. आहारतज्ञ देखील सकाळी नाश्त्यामध्ये हिरवी पानकोबी खाण्याचा सल्ला देतात. आरोग्याला हे सॅलडही फायदेशीर आहे.
advertisement


