छ.संभाजीनगर स्टेशनवर पाटीजवळ लघुशंका करणाऱ्या तरुणाने संपवलं जीवन, व्हायरल व्हिडीओने घेतला बळी

Last Updated:

दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफीचा एक व्हिडिओ आला. ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.

News18
News18
रवी जयस्वाल, प्रतिनिधी
जालना: छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथं नव्याने फलक लावण्यात आले आहे. या फलकाजवळ एका तरुणाने लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील तरुणाने नंतर माफीही मागितली होती. पण, आता या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथल्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील तरुणाचं नाव महेश आढे असं होतं. या तरुणाने आता
advertisement
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. महेश आढे हा जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी होता.
महेश आढे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करत होते. तिथे एका तरुणाने यांचा व्हिडीओ काढला. तेव्हा हे दोन तरुण नशेत असल्याचं कळलं. नंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफीचा एक व्हिडिओ आला. ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. पण तरीही यांचे व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते.
advertisement
महेश आढे आणि त्याच्या मित्राला रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. त्यामुळे महेश आढे या तरुणाने मंगळवारी घरी आणि मित्रांना सांगितलं की, 'मी जीव देईन मला हे सगळं सहन होत नाही'. घरच्या लोकांनी आणि गावकऱ्यांनी त्याची समजूत काढली होती. पण आज बुधवारी गावाच्याजवळ असलेल्या विहिरीत महेश आढे याने विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. ज्यांनी कुणी त्याचे व्हिडिओ व्हायरल केलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ.संभाजीनगर स्टेशनवर पाटीजवळ लघुशंका करणाऱ्या तरुणाने संपवलं जीवन, व्हायरल व्हिडीओने घेतला बळी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement