रायबरेली : 'एक उत्तम कल्पना आयुष्य बदलू शकते', असं म्हणतात. असंच काहीसं घडलं एका शेतकऱ्याच्या बाबतीत. मित्राच्या कल्पनेतून त्यांचं पूर्ण जगणंच बदललं. राधेश्याम मौर्य असं या शेतकऱ्याचं नाव.
राधेश्याम पूर्वी तांदूळ, गहू अशा पारंपरिक पिकांचं उत्पादन घ्यायचे, अधूनमधून भाजीपाला लागवड करायचे. अगदी सामान्य पद्धतीनं हे उत्पादन घेतलं जायचं, त्यामुळे त्यातून काही फारसा नफा होत नव्हतं. जास्त पाऊस झाला की, पीक खराब व्हायचं.
advertisement
हेही वाचा : शेतकऱ्यांनो, 100 टक्के अनुदानावर मिळवा बॅटरी फवारणी पंप, असा करा अर्ज!
उत्तर प्रदेशच्या रायबरेलीचे रहिवासी असलेले राधेश्याम एकदा आपल्या शेतातली वांगी बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले होते. तिथं त्यांची भेट झाली मुलायम सिंह आणि संतोष चौधरी यांच्याशी. राधेश्याम यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. तेव्हा ते मित्र म्हणाले, 'तू काळजी करू नको. तुला आम्ही एक अशी पद्धत सांगू की, पावसाळ्यात अजिबात पीक खराब होणार नाही.'
राधेश्याम मौर्य सांगतात, 'दोन्ही मित्रांनी मला मचाण पद्धतीनं शेती करण्याची कल्पना दिली. मग एका एकरात मी मचाण पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड सुरू केली. आता पावसाळ्यातही पीक सुरक्षित आहे. अजिबात पाणी साचून पिकांचं नुकसान होण्याची भीती वाटत नाही.'
मचाण कसं तयार करायचं?
राधेश्याम मौर्य यांनी सांगितलं की, मचाण तयार करण्यासाठी बांबू, लोखंडी तार आणि कापसाची दोरी लागते. शेतात चांगली नांगरणी केल्यानंतर सलग अडीच ते 3 फूट खोल खड्डा खोदून त्यात बांबूचे तुकडे गाडले जातात. हे तुकडे लोखंडी तारेने किंवा धाग्याच्या दोरीने बांधून सापळा तयार केला जातो.
मचाण तयार झाल्यानंतर त्याच बांबूच्या तुकड्यांजवळ रोपाची पेरणी करतात. जसजशी वनस्पती वाढते. तसतशी कापसाच्या पातळ दोरीच्या साहाय्याने तिची वेल त्याच जाळीवर बसवली जाते, ज्यामुळे फळं आल्यावर ती जमिनीला चिकटत नाहीत. अशाप्रकारे भाजीपाला लागवड करताना शेतात पाणी साचलं तरी फळांचं नुकसान होत नाही.
वेलवर्गीय भाज्यांसाठी उपयुक्त पद्धत!
राधेश्याम मौर्य म्हणाले की, मचाण पद्धत ही वेलीच्या भाज्यांसाठी सर्वात उपयुक्त आहे. कारण त्यामुळे कोणत्याही हंगामात पीक वाया जाण्याचा धोका नसतो. ते स्वतः एका एकरात दुधीची लागवड करून चांगला नफा मिळवतात. महत्त्वाचं म्हणजे ते ऋतूनुसार भाजीपाल्याची लागवड करतात.
सध्या त्यांच्याकडे 1 एकरात दुधी आणि 1 एकरात वांगी आहेत. शेतात तयार झालेला भाजीपाला ते रायबरेली, बाराबंकी आणि लखनऊमधील बाजारात विक्रीसाठी पाठवतात. जिथून त्यांना चांगला नफा मिळतो.
मुलायम यांच्या कल्पनेनं बदललं नशीब!
राधेश्याम सांगतात, बाराबंकीमध्ये राहणारे मित्र मुलायम आणि संतोष चौधरी यांच्या कल्पनेमुळे नशीब बदललं. आता ते वर्षाकाठी लाखो रुपये कमवतात. आता त्यांना पीक वाया जाण्याचाही धोका नाही.
मचाण पद्धतीचे फायदे :
- पावसाळ्यात पीक खराब होण्याचा धोका नाही.
- जास्त उत्पादन मिळतं.
- कमी खर्चात अधिक नफा मिळतो.
- पर्यावरणपूरक पद्धत.
राधेश्याम मौर्य यांच्या प्रगतीतून घेण्यासारखं काय?
- नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करून आपण शेतीत अधिक उत्पादन घेऊ शकतो.
- शेतातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.