शेतकऱ्यांनो, 100 टक्के अनुदानावर मिळवा बॅटरी फवारणी पंप, असा करा अर्ज!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यानुसार शेतकऱ्यांना आता 100% अनुदानावर बॅटरीवर चालणारा फवारणी पंप मिळणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाला असून खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या आहेत. अनेक ठिकाणी पीक उत्तम बहरलं असून आता फवारणीची लगबग सुरू आहे. सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यानुसार शेतकऱ्यांना आता 100% अनुदानावर बॅटरीवर चालणारा फवारणी पंप मिळणार आहे.
यावर्षी म्हणजे सन 2024-25 मध्ये बॅटरी संचलित फवारणी यंत्र वाटप करण्यात येईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यासाठी 660 पंप देण्यात येणार आहेत. दरम्यान, याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
advertisement
- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
- वरील लिंकवर युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करावं.
- 'अर्ज करा' यावर क्लिक करावं.
- 'कृषी यांत्रिकीकरण -> बाबी निवडा' यावर क्लिक करावं.
- 'मुख्य घटक बाबी'वर क्लिक करून –» कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडावं.
- 'तपशिल बाबी'वर क्लिक करून – मनुष्यचलीत औजारे घटक निवडावे.
- 'यंत्र / औजारे व उपकरणे बाबी'वर क्लिक करून – पिक संरक्षण औजारे निवडावे.
- 'मशीनचा प्रकार बाबी'वर क्लिक करून बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस निवडणे.
advertisement
दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. परंतु मागील काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलमधील काही तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे संकेतस्थळ दुरुस्त करून अर्जासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली जातेय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 13, 2024 11:02 AM IST