शेतकऱ्यानं केला प्रयोग, घेतलं लाल मिरचीचं उत्पादन! आज एकरी नफा 3 लाखांचा

Last Updated:

ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यास जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे मिरचीचे 3 तोडे निघतात. त्यानंतर सुकलेली लाल मिरची कंपनीकडून ठरलेल्या दरानुसार खरेदी केली जाते.

+
5

5 महिन्यांमध्ये हे पीक घेतलं जातं.

अभिजीत पवार, प्रतिनिधी
बीड : जगभरात जेवणात तडक्यासाठी वापरली जाणारी 'रेड पेपरीका' म्हणजेच लाल मिरचीची लागवड करून बीड जिल्ह्यातील चाकरवाडी इथल्या शेतकऱ्यानं एकरी 3 लाख रुपयांचा नफा मिळवलाय.
चाकरवाडी इथले शेतकरी अमोल पवार आणि मिथुन पवार या दोन भावांनी रेड पेपरिका या मिरचीची लागवड केली. विविध कृषी प्रदर्शनांमधून माहिती मिळवून ते सतत आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग म्हणून 2021 साली त्यांनी रेड पेपरिका या मिरचीची लागवड केली. खर्च वगळून हमखास चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनी यात सातत्य राखलं. हा आदर्श घेऊन आज परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेड पेपरीका मिरचीची लागवड करत असल्याचं पाहायला मिळतं.
advertisement
5 महिन्यांमध्ये हे पीक घेतलं जातं. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यास जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे मिरचीचे 3 तोडे निघतात. त्यानंतर सुकलेली लाल मिरची कंपनीकडून ठरलेल्या दरानुसार खरेदी केली जाते.
लागवड ते काढणी असा एकरी सरासरी खर्च 80 हजार रुपयांपर्यंत येतो. ज्यात बियाणे, बियाण्यांपासून रोपेनिर्मिती, शेत तयार करणे, बेड तयार करणे, मल्चिंग पसरवणे, ठिबक सिंचन आणि नियमित 8 दिवसांनी कंपनीद्वारे मिरचीची पाहणी केली जाते, पिकासाठी आवश्यक घटकांची फवारणी सुचवली जाते. त्यानुसार आठवड्याने या पिकावर बुरशीनाशक, किटकनाशक आणि इतर खतांची फवारणी केली जाते. इथपासून ते मिरचीची तोड करण्यापर्यंत एकूण एकरी 80 हजार रुपयांचा खर्च येतो.
advertisement
दराबाबत बोलायचं झाल्यास चांगल्या दर्जाच्या मिरचीस 295 रुपये किलो आणि दुय्यम दर्जाच्या मिरचीस 270 रुपये किलो असा दर मिळतो. म्हणजेच एकरी 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न या मिरचीतून मिळतं. सगळा खर्च वजा करून एकरी 2.5 ते 3 लाख रुपयांचं हमखास उत्पन्न रेड पेपरिका मिरचीमधून मिळत असल्याचं अमोल पवार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यानं केला प्रयोग, घेतलं लाल मिरचीचं उत्पादन! आज एकरी नफा 3 लाखांचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement