TRENDING:

दुष्काळी माणमध्ये AC पोल्ट्री फार्म, दोन भाऊ मिळून करतायत लाखोंची कमाई

Last Updated:

दुष्काळावर मात करत दुष्काळी भागातील दीडवाघवाडी या छोट्याशा गावात दीडवाघ बंधूंनी AC पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या AC पोल्ट्री व्यवसायामधून हे दोन्ही बंधू महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी 
advertisement

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुका म्हटलं की सदैव दुष्काळी तालुका म्हणूनच या तालुक्याची ओळख सांगितली जाते. हा तालुका कायमचा दुष्काळी तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चिला जातो. या तालुक्यात काही महिने पिण्यासाठी पाणी मिळत नाही अन् शेताला देखील पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागात शेतीबरोबर कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय केला जातो. याच दुष्काळावर मात करत दुष्काळी भागातील दीडवाघवाडी या छोट्याशा गावात दीडवाघ बंधूंनी AC पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या AC पोल्ट्री व्यवसायामधून हे दोन्ही बंधू महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.

advertisement

माण तालुक्यातील दीडगाववाडी या छोट्या गावात महेश आणि सुहास दीडवाघ हे बंधू राहतात. आई आणि वडीला सोबत हे दोघे बंधू पूर्वी मुंबई येथे राहायचे. हे दोन्ही भावंड मुंबईमध्येच मोठी झाली. महेश याने केमिकल डिप्लोमा याचे शिक्षण घेतले मात्र नोकरी करण्याऐवजी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई सोडून गावाला आले. वडिलांचे 22 एकर वडिलोपार्जित शेती होती पण दुष्काळी भागात शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नव्हती. कमी पाण्यात माळरान जमिनीवर नेमकं काय व्यवसाय सुरू करायचं याचे कोडे या दोन्ही भावांना पडले होते. त्यांनी शेळीपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन यांसारख्या अनेक शेतीपूरक व्यवसाय याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कमी पाण्यात पोल्ट्री हा चांगला पर्याय होऊ शकतो ते त्यांनी जाणले फलटण येथे करार पद्धतीचा पोल्ट्री व्यवसाय पाहण्यात आला. त्याची सर्व तांत्रिक माहिती आणि आर्थिक गणिते समजून घेत त्यांनी आपल्या रानामध्ये पोल्ट्री सुरू केली.

advertisement

सोयाबीनला पांढऱ्या माशीचा धोका, पिवळा विषाणू दिसताच गाढून टाका! कृषीतज्ज्ञांचा सल्ला

24 वर्षाच्या महेश यांना त्यांच्या लहान बंधूंची साथ मिळाली आणि दहा ते बारा लाख रुपये खर्चून 170 बाय 30 फूट आकाराचे पाच हजार पक्षी क्षमतेचे शेड उभारले. चार हजार पक्ष्यांची बॅच घेत संबंधित कंपनीची पक्षाची विक्री देखील केली हळूहळू व्यवसायातील बारकावे ओळखून येऊ लागले. अर्थशास्त्राचा अभ्यास होऊ लागला. त्याचबरोबर हळूहळू आत्मविश्वास वाढला त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये 200 बाय 30 फूट आकाराचे 6000 पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभारले दोन्ही शेडमधून 11 हजार पक्षांच्या बॅच घेतल्या जाऊ लागल्या. यातून आता त्यांना वर्षांकाठी नफा हा 6 लाखापेक्षा जास्त राहतो.

advertisement

अभ्यास केला अन् निर्णय घेतला, शेतकऱ्यानं लावलं गोल्डन सीताफळ, आता बक्कळ कमाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

एक दिवसाची पिल्ले औषध खाद्य मार्गदर्शन अशा सर्व बाबी संबंधित कंपनीकडून पाठपुरावा घेत सर्व घटकांचे निर्जंतुकीकरण लसीकरण वेळापत्रक तयार करून घेतले. वर्षभर हा कार्यक्रम राबवण्यात आला. पाण्याची व्यवस्था केली उंचावर शेड उभारणी केल्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत झाली. त्यामुळे पक्षी निरोगी राहून वाढ उत्तम होऊ लागली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही भावांनी एकत्र काम केल्यामुळे मजुरांवरील खर्च कमी करण्यात आला. त्यामुळे या पोल्ट्री फॉर्म मधून जास्तीत जास्त नफा मिळू लागला, असं महेश यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
दुष्काळी माणमध्ये AC पोल्ट्री फार्म, दोन भाऊ मिळून करतायत लाखोंची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल