सातारा: सध्याच्या काळात शेती आणि शेतीपुरक व्यवसायांपेक्षा नोकरीकडे तरुणांचा कल अधिक आहे. पण सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा काही तरुण आधुनिक पद्धतीनं शेती आणि पशुपालन करून चांगला नफा मिळवत आहेत. सातारा जिल्ह्यातील जवान राजेंद्र लक्ष्मण गायकवाड यांनी 17 वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावली. आता त्यांनी शेळीपालन सुरू के असून त्यातून ते लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन
जिल्ह्यातील चिंचणी येथील राजेंद्र गायकवाड हे भारतीय सैन्यात होते. 17 वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेळीपालनाचा निर्णय घेतला. राधाकृष्ण गोट फार्म या नावाने त्यांनी घराजवळच शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण एक सैनिक असल्यामुळे हार मानायची नाही असा निश्चय त्यांनी केला.
Pune : ‘असा नट होणे नाही’ शेतकरी जेव्हा रंगमंचावर उभा राहिला!
तरीही जिद्द सोडली नाही
राजेंद्र यांनी शेळीपालनाबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी लोणंद येथील बाजारातून 12 उस्मानाबादी शेळ्या आणल्या. त्याचे संगोपन सुरू केले. पण या शेळ्यांना बंदीस्त पद्धतीनं सांभाळणे अनुकूल ठरत नव्हते. त्यामुळे वर्षभरातच शेळ्या विकून टाकल्या. त्यानंतर त्यांनी राजस्थानी शेळ्या आणल्या. मात्र तोही प्रयोग असफल ठरला. मग आता नेमकं करायचं काय याचा विचार केल्यानंतर पुन्हा एकदा आफ्रिकन बोरचे संगोपन करायचं ठरवलं. आफ्रिकन बोरचा प्रयोग यशस्वी ठरला.
आता शेळ्यांची संख्या 36 वर
राजेंद्र गायकवाड यांनी टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ केली. आज त्यांच्याकडे लहान मोठ्या शेळ्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे. राधाकृष्ण गोट फार्म या गोट फार्ममध्ये आता आफ्रिकन बोअरचे पालन करत ते दीड वर्षा काठी पाच लाखाचे उत्पन्न या शेळीपालनातून घेत आहेत. यासाठी 84 वर्षाचे वडील त्यांना कायम मार्गदर्शन करत असतात.
कराटे खेळासाठी आयुष्य समर्पित केलेला तरूण; गरीब मुलांना देतोय स्वसंरक्षणाचे धडे Video
शेतकऱ्यांना दिला सल्ला
आपल्या शेतामधून वाया जाणारा चाऱ्यामधून किमान दोन ते चार शेळ्या सांभाळून शेतीला जोडधंद्याची साथ द्यावी आणि प्रगतशील शेतकरी व्हावे. त्याचबरोबर नवीन पिढीला जो पर्यंत चांगला रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खताचे प्रोजेक्ट आणि त्याचबरोबर शेतीही करावी, असा संदेश राजेंद्र गायकवाड यांनी शेतकरी आणि नवीन पिढीला दिला आहे.