TRENDING:

ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत लावली स्ट्रॉबेरी, दुष्काळग्रस्त शेतकरी कसा झाला मालामाल? Video

Last Updated:

घरच्या शेतीकडे लक्ष देत असताना आपली शेती परवडणारी कशी होईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 19 डिसेंबर: सध्या काळात दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत आहेत. कमी पाण्यात येणाऱ्या फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. लातूर जिल्ह्यातील गुंफावाडी भागात पाण्याचा तुटवडा आहे. तरीही येथील शेतकरी महेश लांडगे यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग केले. ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत स्ट्रॉबेरीचं आंतरपीक घेतलं आणि त्यांना यातून दुहेरी नफा मिळतोय. त्यांच्या याच प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
advertisement

प्रयोगशील शेतकरी महेश लांडगे

शेतकरी महेश लांडगे यांना गुंफावाडी या त्यांच्या गावात वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. यामध्ये ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, सफरचंद, सीताफळ अशी पिके ते सातत्याने घेत असतात. पदवीचे शिक्षण घेऊन शेती करायची की, नोकरीसाठी प्रयत्न करायचे या विचारात असताना त्यांनी घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. शेती करणे ही वाटते तेवढी सोपी बाब नाही हे त्यांना लक्षात आले. त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, सोयी- सुविधा व बाजारपेठ कशी आहे? याचा त्यांनी अभ्यास केला.

advertisement

50 रुपये किलोचा कांदा थेट 15 रुपयांवर, निर्यात बंदीमुळे शेतकरी संकटात, Video

कमी पाण्यात अधिक उत्पन्न

अत्यंत बारकाईने सर्व गोष्टी त्यांनी सुरुवातीलाच जाणून घेतल्याने पुढे त्यांना फारशी अडचण आली नाही. घरच्या शेतीकडे लक्ष देत असताना आपली शेती परवडणारी कशी होईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळेल याकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. 2013 साली लातूरमध्ये ड्रॅगन फूडची लागवड त्यांनी केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला व त्यातून चांगले उत्पन्नही मिळू लागले.

advertisement

आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी लावगड

ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केल्याने त्याचा अनुभव शेतकरी महेश यांच्या पाठीशी होता. त्यामुळे शेतीत काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला. यंदा सप्टेंबर महिन्यात ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतच आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यांचा हा प्रयोग देखील यशस्वी झाला. दीड महिन्यात स्ट्राबेरीचे पिक तोडणीस येते. आतापर्यंत तोडणी करून एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती महेश यांनी दिली.

advertisement

नववी पास गृहिणी कशी झाली उद्योजक? आवळा प्रक्रिया उद्योगातून महिन्याला 2 लाखांची कमाई

इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

निसर्गाची साथ व प्रमाणिकपणे कष्ट करत राहिलो तर भविष्यात आणखीन 4 लाख रुपये उत्पन्न स्ट्रॉबेरी मधून अपेक्षित आहे. शेतात पिकवलेली स्ट्रॉबेरी लातूर, पुणे, सोलापूर अशा भागात विक्रीसाठी पाठवली जाते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत आहे, असेही ते सांगतात. वर्षकाठी आपल्याला फळबागेतून महेश लांडगे हे लाखोंचं उत्पन्न मिळवतात. स्ट्रॉबेरीचा यशस्वी केलेल्या प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन माहिती घेत असतात. सर्व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम महेश लांडगे हे सातत्याने करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत लावली स्ट्रॉबेरी, दुष्काळग्रस्त शेतकरी कसा झाला मालामाल? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल