नववी पास गृहिणी कशी झाली उद्योजक? आवळा प्रक्रिया उद्योगातून महिन्याला 2 लाखांची कमाई
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
महिलांनी देखील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात उतरावे असे आवाहन आवळा उद्योजक संजीवनी जाधव करतात.
सध्याच्या काळात घरगुती व्यवसायातून काही महिलाही उद्योगाचं आपलं विश्व निर्माण करत आहेत. अशीच काहीशी कहाणी <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालन्यातील</a> संजीवनी जाधव यांची आहे. अवघं नववीपर्यंत शिक्षण झालेल्या संजीवनी यांनी पाच किलो आवळ्यापासून आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला.
advertisement
advertisement
जालना शहरातील बस स्थानक भागात राहणाऱ्या संजीवनी जाधव या गृहिणी आहेत. सिंदखेडराजा हे त्यांचं मूळ गाव आहे. लग्न झाल्यानंतरच त्या जालना इथे स्थायिक झाल्या. त्यांचे पती जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करतात. कमी पगारात मुलांचे शिक्षण शक्य नसल्याने काहीतरी व्यवसाय करावा असं त्यांच्या डोक्यात सतत घोळत होतं.
advertisement
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील एक जाहिरात त्यांच्या पतीच्या लक्षात आली. त्यांनी याबद्दल संजीवनी ताईंना सांगितलं. संजीवनी यांनी देखील तत्परतेने या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. पाच दिवसाचं आवळा प्रक्रिया प्रशिक्षण घेऊन ताईंनी लगेचच प्रयोग म्हणून पाच किलो आवळ्यावर प्रक्रिया करून पाहिली. प्रक्रिया केलेला प्रयोग अतिशय सफल झाला.
advertisement
पुढे संजीवनी ताईंनी आवळ्यावरील प्रक्रिया त्यांनी वाढवत नेली. आवळ्यापासून लोणचं, सुपारी, आवळा कॅन्डी असे अनेक पदार्थ त्यांनी तयार केले. सुरुवातीला घरातच त्यांनी या व्यवसायाला चालवलं. मात्र जेव्हा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. तेव्हा या व्यवसायाला विस्तीर्ण रूप देत जालना एमआयडीसी भागात स्वतंत्र गाळात भाड्याने घेतला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आवळा व्यवसायाच्या बळावर माझ्या तिन्ही मुलांची शिक्षण पूर्ण झाले आणि मी देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याचं संजीवनी सांगतात. तसेच इतर महिलांनी देखील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात उतरावे असे आवाहन त्या करतात. आतापर्यंत याच व्यवसायाने त्यांना तब्बल 19 पुरस्कार मिळवून दिलेत. यापैकी शरद पवारांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार सगळ्यात अविस्मरणीय होता, असं संजीवनी जाधव यांनी सांगितले.









