फर्म पुढे असं म्हणाली, "आमच्या काही ग्राहकांनी या पूर्वी आमच्याविरोधात असे काही ट्विट केले आहेत. पण, यातील बहुतांशी ट्विट्स आणि पोस्ट्स झिरोधा किंवा मार्केटशी संबंधित नसलेल्या बोट्स व अकाउंट्सवरून आली आहेत."
ब्रोकरेज प्लॅटफॉर्म वापरताना तांत्रिक अडथळे आल्याने जयराज पाटील नावाच्या ट्रेडरचं 37 हजार रुपयांचे नुकसान झालं. त्यानंतर बॉयकॉट झिरोधा हा ट्रेंड सुरू झाला. पाटील यांनी मनीकंट्रोलला सांगितलं की, ट्रेडिंग दरम्यान नवीन पोझिशन्स घेतल्याचं त्यांना दिसलं नाही. नेमकं काय घडले आहे, हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत त्यांचं मोठं नुकसान झालं होते. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एरर मेसेज पाठवूनही त्यांना त्यातून बाहेर पडता आलं नाही.
advertisement
ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर तांत्रिक अडचणींची वाढ आणि व्यापाऱ्यांचं होणारे नुकसान यामुळे, एक्सचेंजेसना इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ऍक्सेस (आयआरआरए) प्लॅटफॉर्म सेट करण्यास सांगितलं होतं. हा प्लॅटफॉर्म ऑक्टोबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला आहे.
20 डिसेंबर रोजी जेव्हा पाटील यांना समस्येचा सामना करावा लागला तेव्हा ऑप्शन म्हणून आयआरआयएचा अॅक्सेस दिला गेला नव्हता. याबाबत विचारलं असता झिरोधाने म्हटलं आहे की, त्या दिवशी हा तांत्रिक बिघाड वाटला नाही त्यामुळे आयआरआरएमध्ये शिफ्ट होण्याची गरज वाटली नाही.
"ग्राहकांना त्या दिवशी ऑर्डर देण्यात कोणतीही अडचण आली नाही," असं फर्मने म्हटलं आहे. पण, बँक निफ्टी एक्स्पायरीच्या दिवशी ट्विटरवर ब्रोकरेज प्लॅटफॉर्ममध्ये समस्यांची तक्रार करणाऱ्या अनेक पोस्ट समोर आल्या होत्या.
झिरोधाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, फक्त प्राथमिक आणि डीआर डेटा सेंटर्सच्या गंभीर बिघाडानंतरच ट्रेडिंग मेंबरद्वारे आयआरआरएची मदत घेतली जाते. सर्व सेगमेंट्समध्ये ट्रेडिंग आयआरआरएकडे शिफ्ट करण्याबाबत अटी आहेत. ट्रेडिंग मेंबर विशिष्ट सेगमेंटसाठी आयआरआरएची विनंती करू शकत नाही. शिवाय, आयआरआरएला फक्त दुपारी एक वाजण्यापूर्वी होणाऱ्या तांत्रिक बिघाडांसाठी (इक्विटी सेगमेंटमधील) पाचारण केलं जातं. मार्केट बंद होण्याच्या किमान 2.5 तास आधी आयआरआरए लागू केला जाऊ शकतो. पाटील यांना दुपारी तीननंतर अडचण आली होती.