झी बिझनेसनं दिलेल्या वृत्तानुसार, आठव्या वेतन आयोगाबाबत दिल्लीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा वेतन आयोगाकडून खुलासा मागितला आहे. त्यामुळे सरकारच्या मनात आलं तर केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, अद्याप सरकारकडून याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
निवडणुकीपूर्वी होऊ शकते पगारवाढ
advertisement
2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कर्मचार्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबतही सरकार चर्चा करू शकतं. सध्या तरी या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, वेतन आयोगासाठी कोणतंही पॅनल तयार करण्याची गरज नाही, या मतावर सरकार आहे. या शिवाय पगार रिव्हिजनसाठी नवीन फॉर्म्युला तयार केला पाहिजे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर सुमारे दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होऊ शकतात.
मूळ वेतन 44.44 टक्क्यांनी वाढू शकतं
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागल्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या शिवाय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टरही सुमारे 3.68 पटीनं वाढेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फिटमेंट फॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते. यातील बदलांचा परिणाम संपूर्ण पगारावर होतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टरनुसार पगार मिळतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचार्यांच्या मूळ पगारातही सुमारे 44.44 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.