TRENDING:

सेवानिवृत्तीनंतर सुरु केला व्यवसाय, नाशिककरांसाठी दीपक विकतायत 35 प्रकारचे मासे,1 लाखांच्या वरती कमाई

Last Updated:

अनेकांच्या जेवणातील एक भाग म्हणजे मांसाहार आणि तो सर्वच आवडीने खात असतात. दिपक वाघ यांनी नाशिकमध्ये फिश व्यवसाय सुरु केला असून महिन्याला 1 लाखांच्या वरती कमाई करतात.

advertisement
advertisement

नाशिक : अनेकांच्या जेवणातील एक भाग म्हणजे मांसाहार आणि तो सर्वच आवडीने खात असतात. या करताच सर्वांना चांगल्या क्वालिटीचे आणि एकच ठिकाणी खाण्यायोग्य सर्व समुद्री मासे भेटण्यासाठी नाशिकच्या अमृतधाम परिसरात 'फिश अँड फ्रॉन्स सी फूड मॉल' दिपक वाघ यांनी सुरू केला आहे. त्यांच्याकडे 35 प्रकारचे विविध मासे कमी दरात उपलब्ध आहेत.

advertisement

दिपक यांनी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करावा ह्या विचाराने फिश व्यवसाय गेल्या 4 वर्षापासून सुरू केला. स्वतः नॉनव्हेज प्रेमी असल्याने नाशिकमध्ये हवे तसे मासे हे खायला मिळत नाहीत. याकरिता आपल्या माध्यमातून इतरांना देखील समुद्री मासे खायला मिळणार ह्या मुख्य हेतूने त्यांनी त्यांच्या ह्या व्यवसायाला सुरुवात केली असल्याचे लोकल 18 शी बोलताना सांगितले.

advertisement

पुणेकरांचा नाद खुळा! चांदीच्या ताटात अस्सल सात्विक जेवणाची थाळी, 13 प्रकारच्या पदार्थांनी मन होईल तृप्त!

त्यांच्याकडे सर्व मासे हे खाऱ्या पाण्यातील आणि फ्रेश आहेत. तसेच काही मासे हे गोड्या पाण्यातील देखील आहेत. 160 रुपये किलो पासून ते फिश विक्री करीत असतात. 35 प्रकारचे मासे त्यांच्या ह्या सी फिश मॉलला खरेदीसाठी त्यांनी उपलब्ध केले आहेत. दिपक ह्या व्यवसायात नवीन असताना सुरुवातीला अडचणी आल्याचे सांगतातत्यातच नवीन व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर 10 दिवसातच भारतात लॉकडाऊन देखील लागल्याने मोठे नुकसान देखील त्यांचे झालेपरंतु आपण हार मानणार नाहीव्यवसाय नवीन आहेसुरुवात आहेअनुभव येतील ह्या विचाराने सुरू केलेल्या प्रवासात आज 4 वर्षानंतर नाशिकमध्ये त्यांनी त्यांचे दुसरे सी फिश मॉल देखील सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement

कुठल्या प्रकारचे मासे यांच्याकडे आहेत?

दिपक हे मुंबई आणि कोकणातून संपूर्ण मासे हे ताजे आणत असतात. दर दोन दिवसामागे त्यांचे मासे हे बदलत असतात. त्यांच्याकडे 35 प्रकारचे विविध मासे मिळतातसुरमईओले बोंबीलफ्रॉन्स, राऊ, पापलेट, रूपचंद, कटला, बांगडा, हलवा, पिवळी वाम, काळी वाम, मांडेली तसेच कोकणातील खेकडे देखील आपल्याला मिळणार आहेत.

advertisement

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर एक स्वतःचा व्यवसाय असावा याकरिता सुरू केलेल्या ह्या व्यवसायातून महिन्याला 1 लाखांच्या वरती कमाई दिपक हे करत असून आज त्यांचे नाशिकमध्ये 2 मॉल आहेत.

कुठे भेटणार हे मासे?

नाशिक येथील बळी मंदिर चौकाजवळ असलेल्या 'फिश अँड प्रॉन सी फूड मॉलह्या ठिकाणी मासे मिळतील.

मराठी बातम्या/मनी/
सेवानिवृत्तीनंतर सुरु केला व्यवसाय, नाशिककरांसाठी दीपक विकतायत 35 प्रकारचे मासे,1 लाखांच्या वरती कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल