चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला कर्जावर कमी व्याजदर मिळू शकतो. याशिवाय, चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना कमी व्याजदरावर क्रेडिट कार्ड देखील मिळू शकते.
चांगल्या CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना कर्जाची मंजुरी जलद मिळते. बँका अशा लोकांना कमी धोकादायक मानतात. असे ग्राहक अनेक वेळा पूर्व-मंजुरी मिळालेल्या कर्जासाठी पात्र असतात.
मनीकंट्रोलशी बोलताना, चंदीगडचे अंकेत मित्तल म्हणाले की, "त्यांना ऑक्टोबरमध्ये त्यांच्या कार इन्शुरन्सचे नूतनीकरण करायचे होते. त्यांनी वेळेवर सर्व बिल भरणे सुरू केले आहे आणि त्यांचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा जास्त आहे. इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाइटद्वारे नूतनीकरण करताना त्यांना प्रीमियमवर डिस्काउंट मिळाला. त्यांना 15% डिस्काउंट मिळाला, ज्यामुळे ते खूप आनंदित झाले." चांगला CIBIL स्कोअर चांगली नोकरी मिळवण्यासाठीही मदत करू शकतो. विशेषतः बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) संबंधित नोकऱ्या असलेल्या लोकांचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो.
advertisement
अहमदाबादचे 32 वर्षीय प्रणव गुप्ता यांना एका प्रायव्हेट बँकेकडून मुलाखतीसाठी कॉल आला. कंपनीने त्यांचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री तपासण्यासाठी संमती मागितली. नंतर बँकेच्या HR विभागाकडून त्यांचा क्रेडिट स्कोअर हाय असण्यामुळेच त्याला नोकरी मिळाली. एक चांगला क्रेडिट स्कोअर तुमचं कर्ज, इन्शुरन्स आणि नोकरी मिळवण्याच्या संधींमध्ये मदत करू शकतो. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवून त्याची काळजी घ्या.
चांगल्या क्रेडिट स्कोरचे फायदे
कमी व्याजदराने कर्ज : चांगल्या क्रेडिट स्कोरमुळे कर्जावर कमी व्याजदर मिळतो.
त्वरीत कर्ज मंजुरी : बँका चांगल्या क्रेडिट स्कोर असलेल्या लोकांना कर्ज मंजूर करण्यास प्राधान्य देतात.
पूर्व-मंजूर कर्ज : अशा लोकांना बँकांकडून पूर्व-मंजूर कर्ज ऑफरदेखील मिळू शकते. विम्यावरील सूट
कमी विमा प्रीमियम : चांगल्या क्रेडिट स्कोरमुळे विमा कंपन्या कमी प्रीमियम दरावर विमा पॉलिसी देतात. नोकरी मिळण्यासाठी फायदेशीर
नोकरीच्या संधी : विशेषत: बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी चांगला क्रेडिट स्कोर आवश्यक असतो.
नोकरी मिळते : एचआर विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व्यवस्थितपणाचे मूल्यमापन करण्यासाठी क्रेडिट स्कोर पाहिला जातो. त्यावर नोकरी दिली जाते
हे ही वाचा : Credit Card ने कधीच करु नका या चुका! खराब होईल CIBIL Score
हे ही वाचा : Cibil Score खराब असल्याने बँक क्रेडिट कार्ड देत नाहीये? या जुगाडने लगेच अप्रूव्ह होईल रिक्वेस्ट