TRENDING:

तुमच्या ताईला लखपती नाही करोडपती दीदी करा, भाऊबीजेला ओवळणी म्हणून ही योजना पाहाच!

Last Updated:

तुम्हीही कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी ईटीएफ, बाँड्स, डिजिटल गोल्ड आणि युलिप या गुंतवणूक योजना उत्तम ठरू शकतील.  

advertisement
मुंबई: आजकाल मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. पण अनेक गुंतवणूकदार पैसे बुडण्याचा धोका कमी असणाऱ्या सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. तुम्हीही कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी ईटीएफ, बाँड्स, डिजिटल गोल्ड आणि युलिप या गुंतवणूक योजना उत्तम ठरू शकतील.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

ईटीएफ, बाँड्स, डिजिटल गोल्ड आणि युलिप हे असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत, ज्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. शिवाय तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ती इतरांच्या नावावर सहज ट्रान्सफर देखील करू शकता. चला तर, या योजना नेमक्या काय आहेत? ते जाणून घेऊ.

डिजिटल गोल्ड

सोन्याची खरेदी करणं अनेकांना आवडतं. कारण सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे चांगले रिटर्न्स मिळतात. पण सोनं प्रत्यक्ष खरेदी करून ते सुरक्षित ठेवणं हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत तुम्ही डिजिटल गोल्ड योजनेचा पर्याय निवडू शकता. ही योजना कोणत्याही अडचणीशिवाय सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देते. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित आहे. हे सोनं तुम्ही डिजिटल पद्धतीने सहज विकू तसंच खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला सोनं घरातील किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवण्याची गरज नाही. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुम्ही मोबाईल वॉलेट किंवा गुंतवणूक ॲप्स वापरू शकता. तुम्ही खरेदी केलेलं डिजिटल गोल्ड इतरांच्या नावावर सहजपणे ट्रान्सफर करू शकता.

advertisement

युलिप

युलिप म्हणजेच युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन ही एक गुंतवणूक योजना आहे. ही योजना विमा आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे कॉम्बिनेशन आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे विमा संरक्षणासह शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. युलिप तुम्हाला शेअर मार्केटमधील नफ्यासोबत विमा संरक्षण देखील देते. तुम्ही कोणत्याही विमा कंपनीला किंवा ऑनलाइन विमा पोर्टलला भेट देऊन युलिप पॉलिसी खरेदी करू शकता. विमा कंपनीच्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही पॉलिसी तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर देखील खरेदी करू शकता.

advertisement

बाँड

बाँड हा एक कर्जाचा प्रकार आहे. बरेचदा सरकार तसेच विविध कंपन्या बाँड जारी करतात. जेव्हा तुम्ही बाँड खरेदी करता, तेव्हा तुम्ही कंपनीला त्या बदल्यात कर्ज देत असता. या कर्जाच्या बदल्यात कंपनी किंवा सरकार तुम्हाला त्याचे बाँड देते. त्यानंतर ठराविक काळानंतर सरकार किंवा संबंधित कंपनी तुमचे पैसे ठरलेल्या व्याजदरानुसार परत करते. तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन सरकारी बाँड्स, कॉर्पोरेट बाँड्स किंवा टॅक्स फ्री बाँड्स खरेदी करू शकता. तसंच तुम्ही कोणत्याही ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर जाऊन ते खरेदी करू शकता. ते तुम्ही दुसऱ्याच्या नावावर सहज ट्रान्सफर करू शकता.

advertisement

ईटीएफ

ईटीएफ अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंड हा शेअर मार्केटमधील एक गुंतवणुकीचा प्रकार आहे. जे तुम्ही शेअर्सप्रमाणेच खरेदी आणि विक्री करू शकता. ईटीएफद्वारे तुम्ही एकापेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसारखाच हा प्रकार आहे. फक्त एसआयपीमध्ये तुम्ही हप्त्यांमध्ये गुंतवणूक करता. तर ईटीएफमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही कोणत्याही ब्रोकरेज प्लॅटफॉर्मद्वारे यामध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच ते दुसऱ्याच्या डिमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येतात.

advertisement

दीर्घकाळासाठी कसा आहे फायदा?

ईटीएफ, बाँड्स, डिजिटल गोल्ड, युलिप यामध्ये गुंतवणूक करणे दीर्घकाळासाठी फायदेशीर आहे. तुमचं भविष्य एकप्रकारे आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास या योजना उपयुक्त ठरत आहेत. भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ईटीएफ, बाँड्स, डिजिटल गोल्ड आणि युलिपमध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम ऑप्शन आहे. तुम्हाला इतरांच्या नावावर यामधील गुंतवणूक सहज ट्रान्सफर करता येत असल्याने तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अडचणीच्या काळात सहज मदत करू शकता.

या गुंतवणुकीचा मोठा फायदा म्हणजे यामध्ये चांगले रिटर्न मिळत आहेत. ईटीएफ आणि डिजिटल गोल्ड सारखी गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या मजबूत करते. तसेच बाँड्स आणि युलिपसारख्या अधिक रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीत कमी जोखीम आहे. यामध्ये तुम्हाला स्थिर आणि सुरक्षित परतावा मिळेल. या गुंतवणुकीमध्ये तुमचे पैसे मार्केटमधील चढउतारांपासून सुरक्षित राहतात. या योजनेतील गुंतवणुकीतून ठराविक वेळेनंतर चांगले रिटर्न मिळतात.

स्वतःसोबतच कुटुंबाचं भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी अशा गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवणे हा तुमच्यासाठी योग्य निर्णय ठरू शकतो. तसेच यामधील गुंतवणूक तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक आधार देणारी ठरू शकते. त्यामुळे अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.

यंदा दिवाळीला तुम्हाला चांगला बोनस मिळाला असेल, आमि तुम्ही चांगली गुंतवणूक योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी ईटीएफ, बाँड्स, डिजिटल गोल्ड, युलिप या योजना फायदेशीर ठरू शकतात.

मराठी बातम्या/मनी/
तुमच्या ताईला लखपती नाही करोडपती दीदी करा, भाऊबीजेला ओवळणी म्हणून ही योजना पाहाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल