TRENDING:

1,55,000 रुपयांवर जाणार सोन्या चांदीचा भाव, पण कधी? एक्सपर्ट म्हणतात....

Last Updated:

मुंबईत सोन्याचे दर 1,12,570 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. जागतिक तणाव, फेडरल रिझर्व्हचे निर्णय आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे दरात विक्रमी वाढ.

advertisement
मुंबई: दिवसेंदिवस सोन्यांच्या दरात मोठी वाढ होत आहे. 1 लाख 12 हजार रुपयांवर सोन्याचे दर गेले आहेत. प्रति 10 ग्रॅम एक लाख 12 हजार 570 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या दरात सध्या सुरू असलेली विक्रमी वाढ थांबणार नाही, असा अंदाज जागतिक गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
News18
News18
advertisement

सोन्यात नफा बुकिंग होऊ शकते, असे आस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीईओ दर्शन देसाई यांचे मत आहे, किंमत कमी होताच खरेदीदार सक्रिय होतील. ते म्हणाले, 'भू-राजकीय तणाव आणि फेडरल रिझर्व्हकडून अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर कपातीची शक्यता यामुळे सोन्याला आधार मिळत राहील. सणांच्या काळात ग्राहकांच्या मागणीवर विक्रमी किमतींचा किती परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे.'

advertisement

जागतिक बाजारातही सोने चमकले

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.3% वाढून 3,635.32 डॉलर प्रति औंस झाले. मंगळवारी सोने 3,673.९५ डॉलर प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.

फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत 0.25 बेसिस पॉइंट कपात जवळजवळ निश्चित मानली जात आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे. मध्य पूर्व आणि मध्य आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. मध्यवर्ती बँकांकडून सतत होत असलेली खरेदी आणि ईटीएफमधील गुंतवणूक यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वास वाढला आहे

advertisement

हिंदुस्तान समाचारने दिलेल्या वृत्तानुसार ‘गोल्डमन सॅक्स’च्या एका अहवालानुसार, पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 4500-5000 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. भारतीय बाजारपेठेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, सोन्याचा भाव 1,45,000 ते 1,55,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, जो सध्याच्या दरापेक्षा सुमारे 30% जास्त असेल. हा अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि डॉलरचे कमकुवत होणे यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

advertisement

भारतात गुंतवणूकदारांची वाढती रुची

गुंतवणूक सल्लागार फर्म या-वेल्थचे संचालक अनुज गुप्ता यांच्या मते, भारतातही गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढत आहे. जून 2025 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 2,000 कोटी

मराठी बातम्या/मनी/
1,55,000 रुपयांवर जाणार सोन्या चांदीचा भाव, पण कधी? एक्सपर्ट म्हणतात....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल