मुंबई: सोने आणि चांदी सलग जोरदार तेजी दाखवत 30 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले होते. सप्टेंबर 2025 मध्ये सोन्याने तब्बल 11.85 टक्के परतावा दिला, जो गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठ्या मासिक गेनर्समध्ये गणला जातो. मात्र टेक्निकल चार्ट्स सध्या बाजाराला ओव्हरबॉट झोनमध्ये दाखवत आहेत.
advertisement
केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांच्या मते- अमेरिकेत शटडाउनची बातमी आली किंवा कुठल्याही जिओपॉलिटिकल संकटातून दिलासा मिळाला. जसे की युद्धविराम किंवा सीजफायर तर सोन्या–चांदीच्या भावात मोठा करेक्शन म्हणजेच तीव्र घसरण दिसू शकते.
मंगळवारी प्रत्यक्षात असेच झाले. वरच्या स्तरांवरून सोन्या–चांदीत झपाट्याने विक्री झाली आणि नफा-वसुलीचा दबाव स्पष्टपणे जाणवला. जागतिक पातळीवर डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन बॉण्ड यिल्ड वाढल्याने सोन्या–चांदीवर दबाव वाढला आहे. सोनं जवळपास 2,000 प्रति 10 ग्रॅमने खाली घसरलं, तर चांदी तब्बल 3,650 प्रति किलोने खाली आली. सोनं–चांदीतील अलीकडच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आता सेफ-हेवन अॅसेट्समधून नफा काढत आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.
चांदीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. अलीकडच्या दिवसांत चांदीत सोन्यापेक्षा जास्त वेगाने तेजी झाली होती. मात्र आता येथेही मोठा करेक्शन दिसत आहे. वरच्या पातळीवरून 3,650 प्रति किलो इतकी पडझड झाली आहे. यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळालेले नकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांची नफा-वसुली याशिवाय देशांतर्गत बाजारातील दागिन्यांची कमी झालेली मागणीही कारणीभूत ठरली. जरी हे भाव प्रामुख्याने MCX चे असले तरी त्याचा परिणाम सराफा बाजारावर होणं नक्की आहे.
सप्टेंबर 2025 हा सोन्यासाठी ऐतिहासिक महिना ठरला आहे. केडिया अॅडव्हायजरीच्या आकडेवारीनुसार 2008, 2009 आणि 2011 सारख्या संकटाच्या काळात सोन्याने डबल-डिजिट परतावे दिले होते आणि यंदाही तसाच अनुभव आला आहे.
नोव्हेंबर 2008 मध्ये सोन्याने 13.12 टक्के
नोव्हेंबर 2009 मध्ये 12.93 टक्के
एप्रिल 2006 मध्ये 12.17 टक्के
ऑगस्ट 2011 मध्ये 12.11 टक्के
आणि सप्टेंबर 2025 मध्ये 11.85 टक्के परतावा दिला आहे.
मात्र तांत्रिक संकेत स्पष्टपणे दाखवत आहेत की- सध्या सोने आणि चांदी ओव्हरबॉट झोनमध्ये आहेत. म्हणजेच अल्पावधीत दर खूप वेगाने वर गेले असून येथून करेक्शन होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेत सरकार शटडाउन झालं किंवा जागतिक राजकीय परिस्थितीत काहीसा दिलासा मिळाला, तर सोन्या–चांदीतील मागणी आणखी कमी होईल आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर नफा बुक करतील.
लाँग-टर्म ट्रेंडकडे पाहिल्यास गेल्या तीन वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना चांगले परतावे दिले आहेत. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये इक्विटी आणि इतर अॅसेट्सने सोन्यापेक्षा जास्त नफा दिला आहे. त्यामुळे शॉर्ट-टर्ममध्ये सोनं जरी सुरक्षित पर्याय असलं तरी दीर्घकाळासाठी डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ हेच योग्य धोरण आहे.
सध्या नवीन गुंतवणूकदारांनी लगेच बाजारात उडी घेण्यापेक्षा करेक्शनची वाट पाहणं योग्य ठरेल, असा सल्ला जाणकार देतात. आधीच ज्यांच्याकडे सोनं–चांदी आहे त्यांनी ते होल्ड करावं, कारण लाँग-टर्ममध्ये या दोन्ही धातू पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग राहणार आहेत.