TRENDING:

अमेरिकेत हालचाली अन् भारतात वाढले सोन्या-चांदीचे दर, 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार 11000 रुपये?

Last Updated:

गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी सोन्याचे दर 1,08,000 रुपये तर चांदीचे दर 1,23,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले. MCX, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, डोनाल्ड ट्रम्प चर्चेत.

advertisement
गौरी गणपतीचं आज विसर्जन, सात दिवसांनंतर भरलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप आज देणार आहेत. गौरी पूजनादिवशी म्हणजे सोमवारी सोन्याच्या दरांनी कहर केला. तज्ज्ञांच्या मते डिसेंबरपर्यंत 1 लाख 10 हजार टप्पा गाठतील असा अंदाज होता तोही आता खोटा ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे इतक्या झपाट्याने सोन्याचे दर वाढत आहेत. सोन्याचे दर आज 1 लाख 8 हजारहून अधिक आहेत. GST सह हे दर असले तर GST वगळून सोन्याचे दर 1 लाख 7 हजार 90 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.
News18
News18
advertisement

धनत्रयोदशी, दिवाळी, दुर्गापूजा यांसारखे मोठे सण येणार आहेत. लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचा हंगाम सुरू झाला आहे. भारतात कोणताही सण, शुभकार्य किंवा लग्नसोहळा असो, सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र यंदा या खरेदीसाठी ग्राहकांना जास्तीची किंमत मोजावी लागणार आहे, कारण सोने विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.

सोन्याच्या किंमतीतील ही झपाट्याने झालेली वाढ खरेदीदारांना सर्रास ज्वेलर्सच्या दुकानांपासून दूर खेचत आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याचा दर 1,07,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर ठरला आहे. केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या दरानेही विक्रमी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 14 वर्षांनंतर 40 डॉलर प्रति औंसच्यावर गेली आहे.

advertisement

14 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर चांदी

कमकुवत रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बळकट संकेतांमुळे चांदीचा दर 1.23 लाख रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2011 नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 40 डॉलर प्रति औंसच्या वर गेला आहे. औद्योगिक मागणी वाढणे, गुंतवणुकीत वाढ आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे चांदीचा भाव 1.6 टक्क्यांनी वाढून 40.31 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

advertisement

सोन्याच्या दरवाढीमागील कारणे

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या अपेक्षेमुळे आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. अमेरिकन कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुतांश टॅरिफना बेकायदेशीर ठरवल्यामुळे डॉलरवर दबाव आला आणि सोन्याचा दर आणखी वाढला.

वर्षभरात सोन्यात 32% वाढ

2025 च्या जानेवारी महिन्यात सोने 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज ते 1,02,390 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे, म्हणजे जवळपास 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने दर लवकर कमी होण्याची अपेक्षा नाही. चांदीचा दरही 1.23 लाख रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर आहे.

advertisement

सोन्या चांदीचे दर

24 कॅरेट सोन्याचे दर- 107090 रुपये प्रति तोळा

23 कॅरेट सोन्याचे दर- 102621 रुपये प्रति तोळा

22 कॅरेट सोन्याचे दर- 98158 रुपये प्रति तोळा

20 कॅरेट सोन्याचे दर- 89240 रुपये प्रति तोळा

18 कॅरेट सोन्याचे दर- 80317 रुपये प्रति तोळा

14 कॅरेट सोन्याचे दर- 62472 रुपये प्रति तोळा

advertisement

GST सह कॅरेट सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचे दर- 108025 रुपये प्रति तोळा

23 कॅरेट सोन्याचे दर- 103513 रुपये प्रति तोळा

22 कॅरेट सोन्याचे दर- 98995 रुपये प्रति तोळा

20 कॅरेट सोन्याचे दर- 89998 रुपये प्रति तोळा

18 कॅरेट सोन्याचे दर- 80994 रुपये प्रति तोळा

14 कॅरेट सोन्याचे दर- 62995 रुपये प्रति तोळा

चांदीचे दर -

1 लाख 28 हजार 429 रुपये प्रति किलो

GST सह 1 लाख 29 हजार 191 रुपये प्रति किलो

मराठी बातम्या/मनी/
अमेरिकेत हालचाली अन् भारतात वाढले सोन्या-चांदीचे दर, 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार 11000 रुपये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल