TRENDING:

OMG! 130000 रुपयांवर जाणार चांदीचे दर? सोन्याचं काय होणार, एक्सपर्टर म्हणतात...

Last Updated:

मुंबईत सोनं 1 लाख 2 हजार तर चांदी 1 लाख 17 ते 1 लाख 20 हजार रुपयांवर. अजय केडिया यांच्या मते दर वाढ कायम राहिल्यास सोनं 1.10 लाख, चांदी 1.30 लाखपर्यंत जाऊ शकते.

advertisement
मुंबई : सोन्या चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. चांदीचे दर 1 लाख 17 हजार ते 1 लाख 20 हजार रुपयांवर स्थिरवत आहेत तर सोन्याचे दर 1 लाख 2 हजार रुपयांवर आहेत. आता सणवारांना सुरुवात झाली आहे. सण, लग्नसराई, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतात. सोनं नेहमीच प्रत्येक घरातलं सेफ बँक म्हणून पाहिलं जातं. यंदा सोन्याच्या दराने अक्षरशः विक्रमी झेप घेत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.
गोल्ड सिल्व्हर प्राइज
गोल्ड सिल्व्हर प्राइज
advertisement

1 जानेवारीपासून आतापर्यंत केवळ आठ महिन्यांत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात तब्बल 24,665 रुपयांची वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला 76,161 रुपये असलेलं सोनं आज एक लाख रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्यासोबतच चांदीनेही चांगलीच झेप घेतली. वर्षभरात प्रति किलो चांदीचा दर 86,017 वरून 1,16,525 झाला आहे. म्हणजे तब्बल 30,805 रुपयांनी चांदीही महागली आहे.

advertisement

गेल्या वर्षी 2024 मध्ये सोन्यात फक्त 12,810 रुपयांची वाढ झाली होती. यंदाच्या विक्रमी वाढीमुळे बाजारपेठेतील तज्ज्ञ आणि ग्राहक यांच्यात वेगवेगळ्या भावना उमटताना दिसत आहेत. केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितलं की, अमेरिकेने लावलेल्या शुल्कांमुळे जागतिक बाजारात भू-राजकीय तणाव वाढला आहे. यामुळे सोन्याला स्थिर मागणी मिळतेय आणि दरात सातत्याने वाढ होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर यंदाचं सोनं प्रति 10 ग्रॅम 1 लाख 10 हजार रुपयांपर्यं पोहोचण्याची शक्यता आहे. तूर्तास ते सोनं एक लाख चार हजारपर्यंत वर्षाअखेरीस जाण्याची शक्यता आहे. तर चांदी या वर्षाअखेरीस एक लाख 30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

advertisement

गुंतवणूकदारांचा विचार बदलतोय

सोनं महाग झालं तरी भारतीयांचे त्यावरील प्रेम कमी झालेलं नाही. पण आता गुंतवणूकदारांचा कल फिजिकल गोल्डऐवजी गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड किंवा सॉव्हरेन गोल्ड बाँड्सकडे झुकताना दिसतोय. "घरातलं सोनं विकण्याची वेळ आली तर? असा विचार आम्हाला घाबरवतो. म्हणून आता डिजिटल सोनं खरेदी करण्याकडे लक्ष देतोय," असं एका तरुण गुंतवणूकदाराचं म्हणणं आहे.

advertisement

सण-लग्नसराईवर परिणाम

दसरा-दीपावली आणि पुढच्या लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या वाढत्या दरांचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार हे नक्की. मात्र अनेकांना सोनं हे फक्त दागिन्यांचं नव्हे तर सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक आहे, त्यामुळे मागणीत फारशी घट होण्याची शक्यता नाही.

जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम

डॉलरची ताकद, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून होणारी व्याजदर कपात आणि जागतिक भू-राजकीय घडामोडी यांचा सोन्या-चांदीच्या भावांवर थेट परिणाम होताना दिसतो. त्यामुळे वर्षाअखेरीस सोन्याची किंमत ‘सहा आकडी’ स्थिर होईल अशीच चिन्हं आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
OMG! 130000 रुपयांवर जाणार चांदीचे दर? सोन्याचं काय होणार, एक्सपर्टर म्हणतात...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल