जीएसटीशिवाय एका तोळ्याचा दर 1 लाख 10 हजार रुपयांवर पोहोचलाय. तर, चांदीच्या दरात देखील 276 रुपयांची वाढ एका किलोमागं झाली आहे. सप्टेंबरमध्ये सोन्याचा दर 4 हजार 351 रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीच्या दरात एका किलोमागे 8 हजार 839 रुपयांची वाढ झाली आहे.
टॅरिफ तसंच जागतिक बाजारपेठेची मागणी वाढल्याने सोन्या चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. एकाच दिवसात साधारणपणे 5 हजार रुपयांहून अधिक किंमती वाढल्या आहेत. सराफ मार्केटमध्ये सध्या तणाव आहेच पण सोनं खरेदी करणाऱ्यांची फाफलली आहे. एक लाख 12 हजार हून अधिक किंमत आज एक तोळे म्हणजे 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावी लागणार आहे.
advertisement
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! EMI होणार स्वस्त, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन
चांदीचे दर देखील 2800 रुपयांनी वाढले असून 1 लाख 29 हजार रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. दिवाळीपर्यंत चांदी 1 लाख 30 हजार रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी तज्ज्ञांची आशा होती, मात्र ऐन गणेशोत्सवात आणि पितृपक्षात चांदी 1 लाख 30 हजारचा टप्पा ओलांडेल अशी भीती आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर टॅरिफचं सावट आहे. त्यामुळे आधीच तणाव असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक आणि बँका देखील मोठ्या प्रमाणात सोन्याचे कॉइन, बिस्कीटं, ETF मध्ये गुंतवणूक करत आहेत.