TRENDING:

40 वर्ष एकाच ठिकाणी, डोंबिवलीतले आजी-आजोबा विकतात सँडविच, उत्साह तरुणाईला लाजवेल असा

Last Updated:

मेहनतीला वयाचे बंधन नसतं हेच खरं...हल्ली तरुणाई थोड्याशा त्रासाने लगेच कंटाळून जाते. डोंबिवलीत एक असे आजी आजोबा आहेत ज्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबिवली : मेहनतीला वयाचे बंधन नसतं हेच खरं...हल्ली तरुणाई थोड्याशा त्रासाने लगेच कंटाळून जाते. डोंबिवलीत एक असे आजी आजोबा आहेत ज्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मानपाडा येथे एक आजी-आजोबा मिळून गेले 40 वर्ष एकाच ठिकाणी स्वतःचा सँडविचचा स्टॉल चालवत आहेत. विशेष म्हणजे यांच्याकडे सँडविचचे सात ते आठ प्रकार मिळतात.

advertisement

आजींचं नाव उषा साळवणकर असून आजींचं वय साधारण 58 वर्ष आहे. तर आजोबा यांचं नाव उपेंद्र साळवणकर असून यांच वय 68 आहे. या वयात अनेकांना घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. आराम करायच्या वयात ही जोडी मात्र 'आपल्याला जमतय तेव्हापर्यंत आपण काम करायला हवं 'असं म्हणत जोमाने स्टॉल चालवत आहे. जुने डोंबिवलीकर आजही या आजी आजोबांच्या हातची चव घेण्यासाठी कायम येत असतात.

advertisement

डोंबिवलीतील मानपाडा येथील चार रस्त्याच्या अगदी मागेच यांचा सँडविच स्टॉल आहे. या स्टॉलवर तुम्हाला सँडविच, टोस्ट सँडविच, चीज टोस्ट सँडविच, जाम ब्रेड बटर, ब्रेड बटर, जाम टोस्ट, ब्रेड बटर बटाटा असे सगळे प्रकार मिळतात. यांची किंमत फक्त 25 रुपयांपासून सुरू होते. इथला जाम ब्रेड बटर तर कमाल लागतो. या चीज टोस्ट सँडविचची किंमत 60 रुपये असून चाळीस वर्षांपूर्वीचे लोक इथे खायला यायचे ते आजही हा सँडविच खायला नक्की येतात. यांची खासियत आहे ती यांची बटाट्याची भाजी. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली आणि चविष्ट.

advertisement

लग्नापूर्वी आजोबा एकटेच स्टॉल चालवायचे. पूर्वी अगदी क्रॉफर्ड मार्केट पासून त्यांनी स्टॉल लावायला सुरुवात केली. डोंबिवलीत सुद्धा ते गेले 35 ते 40 वर्ष स्टॉल लावत आहेत. लग्नानंतर आजींनी सुद्धा त्यांना या व्यवसायात साथ द्यायला सुरुवात केली. आज त्यांना एक मुलगा आहे तो सुद्धा चांगलं कमावतो.

'आमचा मुलगा आम्हाला म्हणतो की स्टॉल नका चालवू. पण घरात बसून सुद्धा आम्ही कंटाळतो. त्यामुळेच मनशांतीसाठी आम्ही दोघेही हा व्यवसाय चालवतो. ज्या व्यवसायाने आमचं कुटुंब सावरलं त्याला मी शेवटपर्यंत जपू असं देखील त्यांनी सांगितलं' असे उषा साळवणकर यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
40 वर्ष एकाच ठिकाणी, डोंबिवलीतले आजी-आजोबा विकतात सँडविच, उत्साह तरुणाईला लाजवेल असा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल