जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीत कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार असून, २२ सप्टेंबरपासून ही नवी कर प्रणाली लागू होणार आहे. पण यामध्ये परिषदेनं पहिल्यांदाच Sin Goods आणि सुपर लग्झरी वस्तूंवर आता ४० टक्के कर लावला आहे. तो आधी २८ टक्के इतका होता. त्यामुळे आता पान मसाला, सिगारेट, गुटखा, बीडी आणि अन्य तंबाखू जन्य पदार्थांवर 40 टक्के जीएसटी लागणार आहे. हीच कर प्रणाली शीत पेय आणि नशा न येणाऱ्या पेयांवरही लागू असणार आहे. यामध्ये साखर किंवा गोड ड्रिंक्स, फ्लेवर्ड आणि कॅफीनयुक्त पेय, कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक आणि फ्रूट ज्युस सारखे कार्बोनेटेड पेयांचााही समावेश केला आहे. त्यामुळे सरळ सरळ कोल्ड्रिंक, फूड बिअर किंवा इतर एनर्जी ड्रिंक आहे, ते आता महाग होणार आहे.
advertisement
(GST स्लॅबने बाजारात नवा खेळ, या तारखेपासून बदलणार तुमच्या खरेदीची किंमत; समजून घ्या नवा हिशोब)
कपडे होतील स्वस्त
मनीकंट्रोलच्या माहितीनुसार, बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. आता 2500 रुपयांपर्यंतचे कपडे फक्त 5% जीएसटी स्लॅबमध्ये येतील. याआधी फक्त 1000 पर्यंतचे कपडे या श्रेणीत होते. तर त्यापेक्षा महाग कपड्यांवर 12% कर लावला जात होता. नवीन निर्णयामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेअर ऑयल, सायकलवर 5% GST
यूएचटी दूध (UHT milk), छेना पनीर (Chhena Paneer), पिझ्झा ब्रेड, पोळी (रोटी) आणि पराठा आता 0% जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणताही जीएसटी लागणार नाही. याशिवाय, सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय वापरत असलेल्या वस्तू जसे की केसांचे तेल, साबण आणि सायकल वरील जीएसटी कमी करून 5% करण्यात आला आहे. कार, बाईक आणि सिमेंट वर आता 28% ऐवजी 18% कर लागू होईल. तसेच, टीव्हीवर लागणारा जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.