स्मार्टफोनच्या किमती कमी होतील का?
स्मार्टफोन स्वस्त होण्याची आशा बाळगणारे लोक सध्या थोडे निराश होतील. सरकारच्या ताज्या निर्णयाचा मोबाईल फोनच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही. यापूर्वी स्मार्टफोनवर 18 टक्के जीएसटी लावला जात होता आणि तो आताही सुरूच राहील. यामुळे सध्या स्मार्टफोनच्या किमती कमी होणार नाहीत. तथापि, ग्राहकांना स्मार्टफोनच्या किमतीत कोणताही दिलासा मिळणार नाही असा अंदाज आधीच वर्तवला जात होता.
advertisement
गुड न्यूज! LIC च्या लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर लागणार नाही GST, 3600 ची होईल बचत
स्मार्टफोन स्वस्त का झाले नाहीत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्योग सूत्रांनी आधीच अपेक्षा केली होती की स्मार्टफोनच्या किमती कमी होणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की जर 12 टक्के स्लॅबबद्दल काही चर्चा झाली असती तर काही आशा निर्माण झाली असती, परंतु आता 18 टक्क्यांपेक्षा कमी स्लॅब 5 टक्के आहे. अशा परिस्थितीत, स्मार्टफोनला या स्लॅबमध्ये आणणे कठीण होते. तसंच, इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने सरकारकडे स्मार्टफोनला 5 टक्के स्लॅबमध्ये ठेवण्याची मागणी केली होती. त्यात म्हटले आहे की, फोन आता एक गरज बनले आहेत आणि डिजिटल इंडियाचे एक महत्त्वाचे साधन आहेत. जीएसटी येण्यापूर्वी, बहुतेक राज्यांनी मोबाईल फोनला आवश्यक वस्तूंच्या श्रेणीत ठेवले होते. जीएसटीच्या सुरुवातीला स्मार्टफोनवर 12 टक्के कर होता, जो 2020 मध्ये 18 टक्के करण्यात आला.