MCLR कमी केल्याने कर्जावरील व्याजाचे दर कमी होतात. त्यामुळे EMI कमी होते आणि तुमचे पैसे अधिक बचत होतात. या निर्णयाचा थेट फायदा अशा ग्राहकांना होतो ज्यांचे लोन MCLR शी जोडले गेलेले असते.
पृथ्वीच्या पोटात आहे 'गोल्ड फॅक्टरी', सोने कसे तयार होते? भूकंपामुळे...
MCLRच्या दरात कपात झाल्याचा थेट परिणाम जुन्या फ्लोटिंग रेट लोन म्हणजेच होम लोन, पर्सनल लोन आणि बिझनेस लोनच्या ईएमआयवर होतो. अशा प्रकारची कर्जे ही MCLRशी जोडली गेलेली असतात. MCLRच्या दरात कपात झाल्याने ईएमआय देखील कमी होणार. एचडीएफसी बँकेने ओव्हरनाइट MCLR मध्ये पाच टक्के बीपीएस कपात केली आहे. तो आता ९.२० टक्के वरून ९.१५ टक्के इतका झाला आहे. एक महिन्याचा MCLR आहे इतकाच म्हणजे ९.२० टक्के ठेवण्यात आला आहे. ३ महिन्यांच्या MCLR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सहा महिने ते एक वर्षाच्या MCLR मध्ये ५ बीपीएस कपात करून तो ९.५० वरून ९.४५ इतका करण्यात आला आहे.
advertisement
निर्णय घ्यावा तर गडकरींनीच! १ हजार २०० कोटी रुपयांची केली बचत
बँकेने दोन वर्षाच्या MCLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो ९.४५ इतका ठेवण्यात आला आहे. ३ वर्षाच्या MCLR मध्ये ५ बीपीएस घट करून तो ९.५० टक्क्यांवरून ९.४५ टक्के इतका करण्यात आला आहे.MCLR प्रोसेसमध्ये कर्जासाठी किमान व्याज दर निश्चित केले जाते. MCLR एक किमान व्याजाचे दर आहे ज्यावर बँक उधार देऊ शकते.