अकाउंटमध्ये ठेवता येणारी जास्तीत जास्त रक्कम किती हे जाणून घेण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रत्येक बाबतीत तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किमान रक्कम ठेवावी लागेल. किमान रक्कम नसल्यामुळे पेनाल्टी चार्ज कट करते. वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या स्वतःच्या किमान बॅलेन्स लिमिट निश्चित केल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये किमान बॅलेन्स लिमिट 1,000 रुपये आणि काहींमध्ये 10,000 रुपये आहे.
advertisement
Share Market: 6,000,000,000,000 रुपये बुडाले, आता सलग 3 दिवस बंद राहणार Share Market, काय आहे कारण?
कॅश जमा करण्याची मर्यादा
या सेव्हिंग अकाउंटमध्ये रोखीने पैसे जमा करण्याचीही लिमिट आहे. आयकर नियमांनुसार, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात त्याच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये रोख ठेवू शकते. यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा झाल्यास बँकांना त्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. यासोबतच तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करता तेव्हा तुम्हाला त्यासोबत पॅन क्रमांक द्यावा लागेल. तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत रोख जमा करू शकता. तसेच, जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये नियमितपणे रोख जमा करत नसाल तर ही मर्यादा 2.50 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
10 लाखांची लिमिट
तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाखाच्या लिमिटपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली आणि आयकर रिटर्नमध्ये त्याच्या स्त्रोताविषयी समाधानकारक माहिती दिली नाही. तर छाननी शक्य आहे. या छाननीत तुम्ही पकडले गेल्यास तुम्हाला मोठा दंड ठोठावला जाईल. तुम्ही उत्पन्नाचा स्रोत उघड केला नाही, तर जमा रकमेवर 60 टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 4 टक्के उपकर लावला जाऊ शकतो.
आपण सर्वजण आपली कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी बचत खात्यात पैसे जमा करतो. अशा परिस्थितीत त्याची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. परंतु, हे निश्चित आहे की जर तुम्ही अकाउंटमध्ये जास्त पैसे ठेवले आणि त्याच्या उत्पन्नाचा स्रोत उघड केला नाही, तर ते प्राप्तिकर विभागाच्या छाननीखाली येण्याची शक्यता आहे. जर उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
दुसरे म्हणजे, तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये भरपूर पैसे ठेवले असतील, तर तुम्ही ते मुदत ठेवीमध्ये रूपांतरित करावे. हे तुम्हाला तुमच्या पैशावर योग्य रिटर्न देईल. बचत खात्यात जमा केलेल्या पैशावर अगदी नाममात्र परतावा मिळतो. बँकांमध्ये अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीच्या म्हणजे किमान सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या ठेव योजना आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या पैशावर चांगला रिटर्न मिळेल.