पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत जर तुमचं खातं असेल तर ही बातमी चुकवू नका. तुम्हाला या खात्याचं पुन्हा केवायसी करावं लागणार आहे. री केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्यांनी केलं नाही त्यांचं खातं निष्क्रिय केलं जाणार आहे. आतापर्यंत 55 कोटी लोकांनी जनधन योजनेंतर्गत खाती उघडली आहेत. त्यापैकी काही खाती बंद आहेत किंवा त्यावर कोणतेही व्यावहार केले जात नाहीत.
advertisement
फसवणूक होणार नाही काळजी घ्या!
ज्या खात्यांवर कोणतेही व्यवहार केले जात नाहीत, त्यांची खाती वापरून हॅकर्स फ्रॉड करायचा प्रयत्न करत आहेत. यासाठीच आता बँकेनं पुन्हा केवायसी करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. याशिवाय जे केवायसी प्रक्रिया करणार नाहीत त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. हे करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. यासाठी आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
लोकांचं लक्ष सोन्यावर पण चांदीने मारली बाजी, आतापर्यंतचे मोडले सगळे रेकॉर्ड
पत्ताही बदलता येणार?
1 जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत पातळीवर री केवायसी सुरू केलं आहे. काही कॅम्प देखील लावले जात आहेत. त्यामार्फतदेखील तुम्ही केवायसी करू शकता. मात्र त्याची योग्य माहिती काढून मगच तिथे केवायसी करा. नाहीतर असंच कुणालाही तुमची माहिती देऊ नका. त्यामुळे तुमचं खातं रिकामं होण्याचा धोका आहे हे विसरु नका. जन धन खात्याच्या री-केवायसी अंतर्गत, खातेधारक त्यांच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये देखील बदल करू शकतात. जसे की पत्ता बदलणे किंवा इतर कोणतीही माहिती.
कोणते कागदपत्र लागणार?
जन धन खात्याच्या री-केवायसीसाठी कागदपत्रे जर योग्य नसतील तर तुमचं काम होणार नाही. त्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आवश्यक असेल. या कागदपत्रांद्वारे तुम्हाला तुमचा पत्ता पुरावा देखील द्यावा लागेल.