या योजनेने महाराष्ट्रातील माता-भगिनींचा अखंड विश्वास जिंकला असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची ही क्रांती यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थींच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये सन्मान निधी जमा होईल. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे योजनेमध्ये पारदर्शकता राखली जात आहे. यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत असून, त्यांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात अधिक सहभागी होण्याची संधी मिळत आहे.
advertisement
ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक केलेलं नसेल, KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना मात्र या महिन्याचा हप्ता मिळणार नाही किंवा उशिरा मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत आधीच बरेच घोटाळे झाल्यामुळे पुन्हा एकदा फेरतपासणी केली जात आहे. आयकर विभाग, आरटीओ यांच्याकडून डेटा मागवला जात असून त्यावर क्रॉस चेक केलं जात आहे.
ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांची नावं या अर्जातून बाद करण्यात आली आहेत. तसंच ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यात गेल्या आहेत त्यांचीही नावं या योजनेतून बाद करण्यात आली आहेत. याशिवाय ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखहून अधिक आहे त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आलं आहे. जर तुम्हाला या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर नेमकं काय कारण आहे ते ग्रामपंचायतीमध्ये जाऊन एकदा तपासा.