त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार की नाही अशी चिंता निर्माण झाली आहे. मात्र तुम्ही टेन्शन घेऊन नका. त्याआधी आम्ही तुम्हाला हे शोधायला मदत करणार आहोत. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची नावं यादीतून वगळण्यात आली आहे. ज्या महिलांची नावं वगळली आहेत त्यांना लाभ मिळणार नाही.
माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जुलै हप्त्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत. तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात की नाही, हे कसे तपासायचे आणि पैसे कधी जमा होतील, याबद्दलची माहिती जाणून घेऊया
advertisement
'नारीशक्ती दूत' मोबाईल अॅप वापरा:
Google Play Store वरून "नारी शक्ती दूत" अॅप डाउनलोड करा।
आपला मोबाइल नंबर वापरून लॉगिन करा।
डॅशबोर्डवर लाभार्थी अर्जदारांची यादी हा पर्याय निवडा।
त्यानंतर तुमचे गाव, तालुका, जिल्हा निवडा आणि Search वर क्लिक करा।
स्क्रीनवर तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासता येईल।
अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धत
अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर जा.
मुख्य पानावर “लाभार्थी यादी” किंवा Check Status चार्टावर क्लिक करा.
आवश्यक माहिती (जसे आधार/नोंदणी क्रमांक/मोबाइल नंबर) भरून तपासणी करा.
योजनेत आपले नाव असल्यास, त्याची स्थिती, पैसे जमा होण्याची तारीख इत्यादी तपशील स्क्रीनवर दिसतील.
या सोप्या पद्धती वापरून तुम्ही तुमचा स्टेटस तपासू शकता. या योजनेमुळे अनेक बहिणींना मोठा आधार मिळत असून, त्यांनी कोणतीही अफवा खरी मानू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आयकर विभागामार्फत अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय झाला आहे. जुलै अखेरपर्यंत 42 लाखहून अधिक महिलांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत.
गेल्यावर्षी लाडकी बहीण योजनेत बोनस जाहीर केला होता. मात्र यावेळी असा कोणताही बोनस जाहीर केला नाही. यावेळी महिलांच्या खात्यावर 1500 रुपयेच येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.