आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची डेडलाईन 31 जुलाई, 2023 होती, मात्र तुम्ही कोणत्याही कारणामुळे जर या डेडलाईनपर्यंत तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकला नसाल तर तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत लेट फीस सह अपडेटेड आयटीआर भरू शकता. याचाच अर्थ आज तुमच्या हातात आयटीआर भरण्यासाठी शेवटची संधी आहे. मात्र तुम्ही जर आजही आयटीआर भरू शकला नाहीत तर तुमच्याविरोधात कारवाई होऊ शकते. एवढंच नाही तर मुदत संपल्यानंतर आयटीआर भरला म्हणून तुम्हाला पाच हजारांचा दंड देखील होऊ शकतो.
advertisement
आथार कार्ड अपडेशन - कोणत्याही शुल्काशिवाय आधार कार्ड अपडेशनची डेडलाईन देखील आजपासून संपत आहे. तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करायचं असेल तर ते तुम्ही आज करू शकता. उद्यापासून त्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. उद्या तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं तर त्यासाठी तुमच्याकडून पन्नास रुपयांचं शुल्क आकारण्यात येईल.
बँक लॉकर अॅग्रीमेट डेडलाईन - आरबीआयकडून ज्या बँकांमध्ये लॉकरची सुविधा आहे, अशा सर्व बँकांना ग्राहकांकडून नवं बँक लॉकर अॅग्रीमेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची डेडलाईन देखील आज संपत आहे. जर तुम्ही अद्यापही केलं नसेल अशा परिस्थितीमध्ये तुमचं बँक लॉकर फ्रीज होण्याची शक्यता आहे.
तुमचा UPI ID होऊ शकतो बंद - जर तुमच्याकडे असा एखादा युपीआय आयडी असेल जो तुम्ही गेल्या वर्षभरापासून वापरलाच नसेल तर तो बंद होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडेही असा एखादा UPI ID असेल तर आजच त्याचा वापर करा, त्यामुळे तो बंद होणार नाही.
एलपीजी गॅस सिलिंडरचे दर - दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जारी होतात. एक जानेवारीला देखील नवे दर जारी होणार आहेत. त्यामुळे गॅस महागणार की स्वस्त होणार हे पहावं लागणार आहे.