रिझर्व्हेशन उघडल्यावर पहिले 15 मिनिटे महत्त्वाची
नवीन नियमानुसार, कोणत्याही ट्रेनचे रिझर्व्हेशन उघडल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत केवळ तेच लोक ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील, ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले आहे. याचा अर्थ, ज्या प्रवाशांनी त्यांचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांना रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतरची पहिली 15 मिनिटे ऑनलाइन बुकिंगची परवानगी मिळणार नाही. आधार व्हेरिफाय झालेल्या खात्यांनाच बुकिंगमध्ये प्रायोरिटी दिली जाईल.
advertisement
Rule Change: ट्रेन तिकीट ते UPI पेमेंटपर्यंत आजपासून बदलले 5 नियम, लगेच वाचा नाहीतर होईल नुकसान
फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
तिकीट बुकिंगमध्ये होणारी दलाली आणि फ्रॉड थांबवण्यासाठी भारतीय रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला. आधार ऑथेंटिकेशन केवळ व्हेरिफाईड युजर्सपर्यंत तिकीट पोहोचेल याची खात्री देतो. यामुळे थोक बुकिंग कमी होईल आणि गरजू प्रवाशांना रेल्वेच्या सुविधांचा योग्य लाभ मिळेल, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
विंडो तिकीटाचं काय?
रेल्वेच्या रिझर्व्हेशनचा हा नवीन नियम IRCTC ची वेबसाइट आणि मोबाईल ॲप या दोन्हीवर लागू होणार आहे. मात्र, रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जाऊन कॉम्प्युटरद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही प्रक्रिया किंवा वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहील. म्हणजेच, काउंटरवरून तिकीट काढणाऱ्यांसाठी आधार व्हेरिफिकेशनची सक्ती तात्काळ लागू नसेल.
LPG Gas Cylinder: दसऱ्याआधी मोठा धक्का, LPG च्या दरात पुन्हा वाढ, तुम्हाला किती रुपयांना मिळणार लगेच चेक करा
उदाहरणार्थ, जर तुम्हाला 15 नोव्हेंबरसाठी शिवगंगा एक्सप्रेसचे तिकीट बुक करायचे असेल, तर त्याची ऑनलाइन बुकिंग विंडो समजा मध्यरात्री साडेबारा नंतर उघडेल. आता, 12:30 ते 12:45 वाजेपर्यंतच्या या १५ मिनिटांमध्ये, केवळ तेच युजर्स तिकीट बुक करू शकतील ज्यांचे IRCTC अकाउंट आधार व्हेरिफाईड आहे. आधार व्हेरिफिकेशन नसलेले युजर्स या वेळेनंतरच म्हणजे 12:45नंतर बुकिंग करू शकतील. या नियमामुळे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले IRCTC खाते त्वरित आधारशी जोडून घेणे आवश्यक झाले आहे. नाहीतर कन्फर्म तिकीट मिळणं कठीण होऊ शकतो.