TRENDING:

15 लाखांचं उत्पन्न असेल तर कोणता टॅक्स रिजीम निवडायचा, जुना की नवा?

Last Updated:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. वार्षिक उत्पन्न 12 लाखांपर्यंत करमुक्त ठरवले. 15 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी जुनी टॅक्स रीजिम अधिक फायदेशीर.

advertisement
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला देशाचा 2025-26 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. मध्यमवर्गाला दिलासा देणारा वैयक्तिक कराबाबतचा त्यांचा निर्णय प्रचंड गाजला. वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असलेल्या करदात्यांना कर भरावा लागणार नाही असा महत्त्वाचा निर्णय त्यांनी या वर्षासाठी जाहीर केला. त्यानंतर कुणाला किती कर लागू होईल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला वर्षाला 15 लाख रुपयांचं पॅकेज म्हणजे वार्षिक पगार तेवढा असेल तर तुम्ही कोणती करप्रणाली नवी की जुनी टॅक्स रीजिम घेणं हिताचं आहे?
आयकर
आयकर
advertisement

आयकर विभागाने बजेट सादर झाल्यानंतर करदात्यांसाठी 2024-25 आणि 2025-26 आर्थिक वर्षांसाठी नवीन टॅक्स रीजिम अंतर्गत करांची तुलना करण्यासाठी एक टूल उपलब्ध करून दिलं आहे. हे टूल करदात्यांना त्यांच्या उत्पन्न आणि करकपातींवर आधारित कोणती टॅक्स रीजिम अधिक फायदेशीर आहे हे ठरवण्यास मदत करते.

मला किती कर भरावा लागेल? आता करा कॅल्क्युलेट

advertisement

एक फेब्रुवारी 2025च्या केंद्रीय बजेटनंतर, करदाते आता अद्ययावत कर स्लॅब संरचनेअंतर्गत त्यांना किती कर भरावा लागेल याचं मूल्यांकन करत आहेत. सर्वसामान्य करदात्यांची द्विधा ही आहे की, जुनी टॅक्स रीजिम सुरू ठेवायची की नवीन टॅक्स रीजिमकडे वळायचं?

बजेट 2025 च्या भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन टॅक्स रीजिममध्ये सुधारणा जाहीर केल्या, जसे की मूलभूत करातून 4 लाख रुपयांपर्यंत सूट. कर स्लॅब आणि सवलतींच्या फायद्यांमध्ये अलीकडील सवलतींसह, वार्षिक 12.75 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या व्यक्तींना आता कर भरण्यापासून सूट मिळेल.

advertisement

शेअर मार्केटच्या 'लांडगा' फिनफ्लुएन्सरवर सेबीची मोठी कारवाई; अस्मिता पटेलला तुम्ही फॉलो करत नाही ना?

जुन्या टॅक्स रीजिममध्ये बदल सुचवलेले नसले तरीही, तज्ञांचं म्हणणं आहे की काही प्रकरणांमध्ये ती नवीन टॅक्स रीजिमच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरू शकते. विविध डिडक्शन्स आणि सवलतींच्या उपलब्धतेमुळे जुनी रीजिम हिताची ठरते ज्यामुळे मध्यम ते उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींचं करपात्र उत्पन्न लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतं. विशिष्ट उत्पन्न गटांतील ज्यांनी त्यांच्या गुंतवणुकीचं धोरणात्मक नियोजन केलं आहे त्यांनी या डिडक्शन्सचा प्रभावीपणे लाभ घेऊन, जुनी टॅक्स रीजिम निवडल्यास त्यांच्यासाठी ती अधिक फायदेशीर ठरू शकते.

advertisement

वार्षिक पगार15 लाख रुपये असलेल्या करदात्यासाठी : जुन्या आणि नव्या टॅक्स रीजिमतील करदायित्व

दोन्ही टॅक्स रीजिमअंतर्गत करभरण्याची तुलना करूया:

जुन्या टॅक्स रीजिमअंतर्गत कर दायित्व

जुन्या टॅक्स रीजिमअंतर्गत, कर स्लॅब खालीलप्रमाणे आहेत:

2.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न: 0%

2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न: 5%

5 लाख ते 10 लाख लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न: 20%

advertisement

10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न: 30%

जुन्या टॅक्स रीजिमअंतर्गत विविध डिडक्शन्स आणि सवलती उपलब्ध आहेत, त्या अशा:

स्टँडर्ड डिडक्शन: 50,000 रुपये

कलम 80C अंतर्गत डिडक्शन्सची कमाल मर्यादा: 1,50,000 रुपये

कलम 80D अंतर्गत डिडक्शन्सची कमाल मर्यादा: 75,000 रुपये

कलम 24B अंतर्गत होम लोन डिडक्शन: 2,00,000 रुपये

80CCD(1B) अंतर्गत अतिरिक्त एनपीएस डिडक्शन: 50,000 रुपये

एकूण उपलब्ध डिडक्शन्स 5.25 लाखांपर्यंत असू शकतात.

या व्यतिरिक्त, मूळ पगार 50,000 रुपये आणि दरमहा 25,000 रुपये एचआरए घटक असलेल्या पगारदार व्यक्तीसाठी, एचआरए सवलत 3 लाख रुपये गृहित धरली होती.

करपात्र उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन:

एकूण पगार: 15,00,000 रुपये

एकूण डिडक्शन्स: 8.25 लाख (5.25 लाख +3 लाख एचआरए यासह) रुपये निव्वळ करपात्र उत्पन्न: 6.75 लाख रुपये

जुन्या टॅक्स रीजिमअंतर्गत देय कर:

0 – 2.5 लाख रुपये : 0 रुपये

2.5 लाख – 5 लाख रुपये 5% : 12,500 रुपये

5 लाख – 6.75 लाख रुपये 20% : 35,000 रुपये

एकूण कर : 47,500

सेस (4%): 1,900 रुपये

अंतिम करदायित्व: 49,400 रुपये

नवीन टॅक्स रीजिम अंतर्गत करदायित्व

नवीन टॅक्स रीजिम 2025 अंतर्गत नवीन कर स्लॅब

0 - 4 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 0% कर

4 लाख - 8 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 5% कर

8 लाख - 12 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 10% कर

12 लाख - 16 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 15% कर

16 लाख - 20 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 20% कर

20 लाख - 24 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी 25% कर

24 लाखां रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी 30% कर

डिडक्शन्स आणि सवलती (नवी टॅक्स रीजिम):

स्टँडर्ड डिडक्शन: रु. 75,000 (या एकमेव डिडक्शनला परवानगी आहे.)

करपात्र उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन:

एकूण पगार: 15,00,000 रुपये

स्टँडर्ड डिडक्शन: 75,000 रुपये

निव्वळ करपात्र उत्पन्न: रु. 14,25,000 रुपये

नवीन टॅक्स रीजिमअंतर्गत देय कर:

0 – 4 लाख रुपये : 0 रुपये

4 लाख – 8 लाख रुपये 5%: 20,000 रुपये

8 लाख – 12 लाख रुपये 10%: 40,000 रुपये

12 लाख – 14.25 लाख रुपये 15%: रु. 33,750 रुपये

एकूण कर: 93,750 रुपये सेस (4%): 3,750 रुपये

अंतिम करदायित्व: 97,500 रुपये

करदात्यांनी हे घ्यावं लक्षात

ही तुलना हे दाखवून देते की ज्या करदात्याचं वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये आहेत आणि जी व्यक्ती HRA सवलतींसंबंधी दावा करण्यास पात्र आहे अशा व्यक्तीने जुनी टॅक्स रीजिम निवडल्यास ती 48,100 रुपये कर वाचवू शकते. हे पण लक्षात घ्यायला हवं की ती व्यक्ती सर्व उपलब्ध डिडक्शन्सचा लाभ घेऊ शकली आणि एचआरए सवलतींचा दावा करण्यास इन्कम टॅक्स कायद्यानुसार पात्र ठरत असेल तरच एवढे रुपये वाचतील. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, सर्व करदाते या लाभांसाठी पात्र असतीलच असं नाही. कलम 10(13A) अंतर्गत HRA लाभांचा दावा करण्यासाठी विशिष्ट अटी लागू होतात, विशेषत: जे करदाते कलम 24B अंतर्गत होमलोनच्या व्याजावर डिडक्शन घेऊ इच्छिता त्यांना या सवलती मिळू शकतात.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

मराठी बातम्या/मनी/
15 लाखांचं उत्पन्न असेल तर कोणता टॅक्स रिजीम निवडायचा, जुना की नवा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल