TRENDING:

पैसा पैसा कराल तर अकाउंट होईल रिकामं! सांगलीतल्या प्रदीप यांनी गमवले 25 लाख, नेमकं काय घडलं?

Last Updated:

सांगलीच्या प्रदीप गणपतराव चव्हाण यांना गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली निखिल शर्मा याने 25 लाख 35 हजार 364 रुपयांची फसवणूक केली, पोलिसांत गुन्हा दाखल.

advertisement
प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसे हवेत, पैशांच्या मागे धावता धावता आपल्या हातात असलेले पैसे कधी जातील याचा नेम राहात नाही. कधी डॉक्टरकडे कधी वस्तूंवर तर कधी आपल्या चुकांमुळे पैसा हातून जातो. मात्र सांगलीमधील एका व्यक्तीसोबत अजब घडलं. पैशांचा मोह नडला, तो गोड बोलण्याला फसला. त्याच्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडण्याची भीती आहे. त्यामुळे तुम्ही सतत अलर्ट राहावं लागेल.
News18
News18
advertisement

सांगलीच्या विश्रामबाग परिसरात राहणारा प्रदीप गणपतराव चव्हाण हा एक विश्वासू आणि मेहनती माणूस. काही महिन्यांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा त्याच्याशी फोनवर संपर्क झाला. त्या व्यक्तीने स्वतःला 'गोल्ड ट्रेडिंग' क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याचं सांगितलं. सुरुवातीला काही दिवस गप्पा, बाजारातील सोन्याच्या किंमतींचे अंदाज, गुंतवणुकीच्या संधी… आणि मग हळूहळू विश्वास जिंकण्याचं काम सुरू झालं.

“थोडं सोन्यात ट्रेडिंग कर, रोज काही हजार रुपयांचा नफा मिळेल,” असं सांगत त्या व्यक्तीने प्रभात यांना डिजिटल व्यवहारातून काही रक्कम गुंतवायला सांगितलं. सोनं आणि नफा या दोन्ही गोष्टींवर त्यांचा विश्वास होता. सोन्यात कधीही फसवणूक होणार नाही असं त्यांना वाटलं, त्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवला मग काय सुरू झाला पैशांचा व्यवहार सुरू झाला. थोडेथोडे करून लाखोंचा व्यवहार.

advertisement

जसजसे दिवस गेले, तसतसा नफ्याचा मागमूसही गायब झाला. व्यवहारांचे स्क्रीनशॉट पाठवणं थांबलं, फोन उचलणं बंद झालं, आणि ‘गोल्ड ट्रेडिंग कंपनी’च्या नावाने बोलणारी ती व्यक्ती जणू जादूगारासारखी गायब झाली. काही समजायच्या आत त्या माणसानं सगळा बिस्तारबोजा गुंडाळला होता. प्रदीप यांचं डोकं चालायचं बंद झालं. आपण इतक्या सहज फसवलो गेलो याची खंत मनात येऊ लागली. आपण कसे मूर्ख बनलो स्वत:ला दोष देऊ लागले.

advertisement

आता काहीच उपयोग नव्हता, कारण खात्यावरची आयुष्यभराची जमापुंजी गेली होती. तब्बल 25 लाख रुपये गमवले होते. प्रदीप यांना तेव्हा समजलं की हा सगळा सोने ट्रेडिंगचा बहाणा करून आखलेला एक भलामोठा फसवणुकीचा सापळा होता. एकूण 25 लाख 35 हजार 364 रुपयांचा गंडा बसल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

advertisement

तक्रारीनंतर सांगली पोलिसांनी निखिल शर्मा या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेने अनेकांना धडा शिकवला. “ऑनलाइन सोनं नेहमीच चमकतं असं नाही, कधी कधी ते डोळे दिपवणारं भास असतो, त्यामागे काळे फसवणूक करणारे हात असतात. त्यामुळे अशा गोड बोलण्याला भूलथापांना बळी पडू नका, तुमची आयुष्यभराची कमाई कायमची गमावून बसाल असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
पैसा पैसा कराल तर अकाउंट होईल रिकामं! सांगलीतल्या प्रदीप यांनी गमवले 25 लाख, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल