RBI चा मोठा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन दिवस चाललेल्या पतधोरण समितीच्या MPC बैठकीनंतर रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रेपो रेट हे आधीसारखेच ठेवले आहेत. रेपो दर 5.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वीच्या एमपीसी बैठकीतही व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
advertisement
होम लोन कार लोनचं काय होणार?
RBI च्या या निर्णयामुळे होम किंवा कार लोनवर कोणताही परिणाम होणार नाही. होम आणि कार लोनचे EMI जसेच्या तसेच राहणार आहेत. सध्या जे हप्ते जात आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीसाठी थोडं बजेट टाइट राहण्याची शक्यता आहे. यंदा दिवाळीला कोणताही दिलासा मिळालेला नाही.
विकासाला चालना
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, एकूण महागाईचे चित्र अधिक अनुकूल आहे. विशेषतः, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी आणि वेगाने घट झाली आहे. याच कारणामुळे केंद्रीय बँकेने या वर्षासाठी सरासरी हेडलाइन महागाई दराचा अंदाज 3.1% वरून कमी करून 2.6% केला आहे. GST चे स्लॅब बदलल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. पैसे अधिक खर्च होतील अशी आशा आहे. याशिवाय H1B व्हिसामुळे बरीच अनिश्चितता आहे.