TRENDING:

स्टेट बँक ऑफ इंडियातील ऑफिसरने शेअर केली Salary Slip, 95 हजार इनहँड पगार प्लस... आकडा पाहून तुम्ही म्हणाल हे कसं शक्य

Last Updated:

SBI Officer salary Disclosure: SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने आपला पगार सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अडीच वर्षांत आणि पाच वेतनवाढीनंतर तिचा मासिक पगार एक लाख रुपयांच्या पुढे गेल्याचे समोर आले आहे.

advertisement
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने अलीकडेच सोशल मीडियावर आपला पगार जाहीर केला आणि त्यानंतर इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली. तिच्या या खुलाशामुळे सरकारी नोकऱ्यांबाबत पुन्हा एकदा उत्सुकता, आश्चर्य आणि वादविवादाला तोंड फुटले आहे.
News18
News18
advertisement

या महिलेने सांगितले की तिने 2022 मध्ये SBI PO ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. गेल्या अडीच वर्षांपासून ती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम करत आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने नमूद केले की तिचा हातात येणारा (in-hand) मासिक पगार सुमारे 95,000 रुपये आहे. याशिवाय तिला 18,500 रुपयांचा घरभाडे भत्ता आणि सुमारे 11,000 रुपयांच्या इतर भत्त्यांचा लाभ मिळतो. या सर्वांचा मिळून विचार केला असता, तिचे मासिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट होते.

advertisement

मात्र तिने हेही स्पष्ट केले की हा पगार तिला सुरुवातीपासूनच मिळत नाही, तर अडीच वर्षांच्या सेवेनंतर आणि पाच वेतनवाढीनंतर (increments) मिळत आहे. “PO म्हणून 2.5 वर्षे काम केल्यानंतरचा हा माझा पगार आहे. यात एकूण पाच increments आहेत. दोन वार्षिक increments आणि JAIIB व CAIIB या परीक्षांमधून मिळालेले तीन अतिरिक्त increments,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

advertisement

JAIIB (Junior Associate of Indian Institute of Bankers) आणि CAIIB (Certified Associate of Indian Institute of Bankers) या बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यावसायिक परीक्षा मानल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक बँक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ दिली जाते, ज्याचा थेट परिणाम पगारावर होतो.

हा पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर काही दिवसांतच 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी तिचे कौतुक केले, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “SBI PO ला 95 हजार रुपये हातात? माझा मित्र PO आहे आणि तो नेहमी सांगतो की इतका पगार नसतो. हे कसं शक्य आहे? वेगवेगळ्या स्केल्स असतात का?”

advertisement

दुसऱ्या एका युजरने म्हटले, “SBI PO होण्यासाठी बुद्धिमान आणि अभ्यासात हुशार असावं लागतं. त्यासोबतच प्रचंड मेहनतही लागते. मी स्वतः अनेक वेळा प्रयत्न केले आहेत, त्यामुळे मला याची जाणीव आहे.” तर आणखी एका युजरने लिहिले, “हा पोस्ट पाहून माझी मोटिव्हेशन पुन्हा सेट झाली, धन्यवाद!”

काही युजर्सनी वर्क-लाईफ बॅलन्स आणि मानसिक आरोग्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. “तुझ्या मानसिक आरोग्याबद्दलही सांग,” अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्याने लिहिले, “ताण, चिंता आणि थकवा याबद्दल तू काहीच बोलली नाहीस.” एका युजरने तर मिश्कीलपणे टिप्पणी केली, “बँकेत काम केल्यानंतर 15 हजार रुपये थेरपीवर खर्च होतात.”

advertisement

हा व्हायरल पोस्ट केवळ पगारापुरता मर्यादित नाही. मेहनत, शिस्त, सतत शिकण्याची तयारी आणि त्यामागचा मानसिक ताण या सगळ्याचं वास्तव या चर्चेतून समोर येतं. SBI PO च्या पगाराच्या आकड्यांनी अनेकांना आकर्षित केलं असलं, तरी त्यामागची मेहनत आणि दबावही तितकाच खरा असल्याचं या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होतं.

मराठी बातम्या/मनी/
स्टेट बँक ऑफ इंडियातील ऑफिसरने शेअर केली Salary Slip, 95 हजार इनहँड पगार प्लस... आकडा पाहून तुम्ही म्हणाल हे कसं शक्य
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल