TRENDING:

Share Market: बजेटनंतर शेअर मार्केटचा मूड बदलला, फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी ती भविष्यवाणी खरी ठरली

Last Updated:

Stock Market Prediction: बजेट सादर होणार म्हणून आज शेअर बाजाराचे कामकाज सुरू होते. बजेट सादर होण्याआधी बाजारात तेजी दिसली होती. मात्र सर्वसामान्यांच्या हाती जास्त पैसे देणारा निर्णय जाहीर झाल्यानंतर देखील बाजारात अचानक मोठी घसरण झाली.

advertisement
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेटमध्ये मोठी घोषणा करत नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाखांपर्यंत उत्पन्नावर टॅक्स लागू न करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या मोठ्या घोषणानंतर शेअर बाजाराला ही कर सवलत पसंत पडली नाही आणि बजेट सादर केल्यानंतर शेअर बाजार खाली आला.
News18
News18
advertisement

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 51 मध्ये घसरण होऊन तो 23,450वर आला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 100हून अधिक अंकांनी घसरून 77,400वर आला. बजेट सादर झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बाजाराच्या कारभारावर झाली. याचा सर्वात मोठा परिणाम पीएसयू शेअर्सवर झाली. RVNL 6% घसरला तर IRB मध्ये 6% वाढ झाली. मझगाव डॉक, BDL आणि NHPC सारख्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

advertisement

फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?

आयकरात सवलत देण्यामागील सरकारचा पहिला उद्देश हा लोकांच्या हातात जास्त पैसा उपलब्ध करुन देण्याचा होता. यामुळे ते त्यांच्या गरजांसाठी खर्च करू शकतील किंवा गुंतवणूक करू शकतील. मात्र शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प फार खास ठरला नाही. अर्थमंत्र्यांच्या भाषणात शेअर बाजाराचे संपूर्ण लक्ष भांडवली खर्चाच्या आकड्यावर होते. परंतु सरकारने भांडवली खर्चात कोणताही मोठा बदल केला नाही आणि तो 10.80 लाख कोटी रुपयांवर ठेवला. पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी भांडवली खर्च वाढण्याची वाट शेअर बाजार पाहत होता. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, उत्पादन आणि पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीतरी विशेष असेल अशी अपेक्षा होती. पण अर्थसंकल्पीय भाषणात तसे काहीही घडले नाही.

advertisement

शेतकरी ते मिडल क्लास कोणाला काय मिळाले? बजेट 2025मधील 11 महत्त्वाच्या घोषणा

BSE Sensex मधील टॉप 30 पैकी 13 शेअर्स वाढले तर 17 शेअर्स घसरले. Zomato च्या शेअर्समध्ये 7% वाढ, तर L&T मध्ये घसरण. NSE टॉप 50 पैकी 23 शेअर्स घसरले, त्यात Hero MotoCorp आणि Wipro यांचा समावेश.

advertisement

63 वर्ष जुना इनकम टॅक्सचा कायदा बदलणार; Budget मध्ये सरकारचा ऐतिहासिक निर्णय

बजेटनंतर IT क्षेत्र वगळता सर्व इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. सर्वात जास्त वाढ रिअल इस्टेट सेक्टरमध्ये झाली. FMCG, बँकिंग आणि अन्य सेक्टर्समध्येही तेजी दिसून आली.

काय होती फेब्रुवारी 2025साठीची भविष्यवाणी

 जगभर प्रसिद्ध आणि बेस्टसेलर पुस्तक ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक आणि अमेरिकन उद्योजक रॉबर्ट कियोसाकी यांनी शेअर बाजाराबाबत एक मोठे भाकीत केले होते. कियोसाकी यांच्यानुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होईल. आज फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच दिवस असून बजेट सादर केल्यानंतर बाजारात घसरण झाली. महिन्याच्या सुरुवातीलाच बाजारात घसरण झाल्याने 

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Share Market: बजेटनंतर शेअर मार्केटचा मूड बदलला, फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी ती भविष्यवाणी खरी ठरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल